IMPIMP

Pune Crime | संतापजनक! 11 वर्षाच्या लेकराला आई-वडिलांनीच 22 श्वानांसोबत घरात ठेवलं डांबून; बाहेर येताच श्वानांप्रमाणं वागू लागला मुलगा, पुण्यातील घटना

by nagesh
Pune Crime | Annoying! The 11-year-old boy was kept at home by his parents with 22 dogs; As soon as he came out, the boy started behaving like a dog, the incident in Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | ‘टारझन’ची (Tarzan) गोष्ट सगळ्यांना माहिती असेलच. वन्य प्राण्यांच्या सहवासात राहिल्याने वन्य प्राण्यांचे गुण त्याच्यामध्ये आले होते आणि तो त्यांच्या सारखाच वागत होता. अशाच प्रकारची एक घटना पुण्यात घडली आहे. दोन वर्षापेक्षा अधिक काळ श्वानांच्या (Dog) पिलांच्या सहवासात बंदिस्त राहिल्याने हा मुलगा आपण माणूस आहोत हेच विसरुन गेला आहे. हा संतापजनक प्रकार पुण्यातील कोंढवा परिसरातील कृष्णाई बिल्डिंगमध्ये (Krishnai Building) उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे त्याच्या या अवस्थेला त्याचे स्वत:चे आई-वडिलच (Parents) जबाबदार आहेत. अखेर या प्रकाराची माहिती एका स्वयंसेवी संस्थेला (NGO) मिळाल्यानंतर त्या मुलाची सुटका करुन आई-वडिलांवर कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) केला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत अपर्णा मकरंद मोडक Aparna Makrand Modak (वय-47 रा. शिवाजीनगर) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पीडित मुलाच्या आई-वडीलांविरुद्ध बालन्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम (Child Justice (Care and Protection of Children) Act) 23,28 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. (Pune Crime)

 

श्वान प्रेमापोटी आई-वडिलांनी घरात 20 ते 22 भटके श्वान पाळले. दोन वर्षापेक्षा अधिक काळ या श्वानांसोबत राहिल्याने मुलाच्या वर्तवणुकीवर (Behavior) परिणाम झाला आणि तो श्वानाप्रमाणे वागू लागला. एवढेच नाहीतर तो शाळेत गेल्यानंतर मुलांचा चावा घेतला. यामुळे त्याला घरात डांबून ठेवण्यात आले होते. अखेर याची माहिती स्वयंसेवी संस्थेला मिळाल्यावर हा प्रकार उघडकीस आला. संस्थेने पोलिसांच्या मदतीने मुलाची सुटका केली.

 

चाईल्ड लाईन या संस्थेच्या (Child Line organization) पुणे जिल्हा प्रकल्प समन्वय अपर्णा मोडक यांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, चाईल्ड लाईनकडून 1098 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. या नंबरवर 1 मे रोजी एका अनोळखी व्यक्तीने संपर्क साधून कोंढवा येथील कृष्णाई बिल्डिंगमध्ये एका फ्लॅटमध्ये 20 ते 22 भटके श्वान पाळले आहे. या फ्लॅटमध्ये एक मुलाला डांबून ठेवल्याची तक्रार त्या व्यक्तीने केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

हेल्पलाईन नंबरवर तक्रार प्राप्त झाल्यानंतर चाईल्ड लाईनचे कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले. त्यावेळी मुलगा श्वानाप्रमाणे वागत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तो खिडकीत बसला होता. घरातून दुर्गंधी येत होती. कार्यकर्त्यांनी मुलाच्या आई-वडिलांना समजावून सांगत त्याला शाळेत पाठवण्यास सांगितले. तसेच मुलाला श्वानांच्या सहवासात ठेवू नका, असेही बजावून सांगितले. मात्र, आई-वडिलांच्या वर्तवणुकीत कोणतीच सुधारणा झाली नाही.

 

 

त्यानंतर चाईल्ड लाईनचे कार्यकर्ते पुन्हा घरी गेले तेव्हा मुलाला घरात डांबून ठेवल्याचे दिसून आले. मुलाच्या आई-वडिलांना फोन करुन बोलावून घेण्यात आले. फिर्यादी यांनी घराची पाहणी केली असता घरात अस्वच्छता होती. तर मुलगा श्वाना जवळ बसला होता. त्याची वर्तणूक श्वानांसारखी वाटल्याने बाल कल्याण समिती पुणे (Child Welfare Committee Pune) आणि पोलिसांना (Pune Police) या बाबत माहिती देण्यात आली.

 

फिर्यादी यांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली त्यावेळी हा मुलगा दोन वर्षापासून घरात पाळलेल्या भटक्या श्वानांसोबत राहत असून
तो घराबाहेर पडत नसल्याचे सांगितले. तसेच तो शाळेत जात नसल्याचे सांगण्यात आले.
फिर्यादी यांनी याबाबत कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील (Senior Police Inspector Sardar Patil) यांना माहिती दिली.
त्यांनी घटनास्थळाला भेट देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चैत्राली गपाट (PSI Chaitrali Gapat) करीत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी सांगितले, पीडित लहान मुलाची त्या घरातून सुटका करणं खरोखर कठीण काम होत.
कारण ते सर्व श्वान भटकी होती. त्यांची नसबंदी झालेली नव्हती. तसेच ती केव्हाही हिंस्र रुप धारण करु शकत होती.
घरामध्ये सर्वत्र प्राण्यांनी घाण केली होती. अशा अस्वच्छ ठिकाणी 22 श्वानांच्या सानिध्यात 11 वर्षाचा मुलगा अडकला होता.
प्राण्यांना आणि लहान मुलांना अस्वच्छ स्थितीत ठेवणं हा गुन्हा (Crime) आहे.

 

मुलाच्या आई-वडिलांनी श्वानांना घरात ठेवण्याची परवानगी घेतली होती का,
याचा तपास पोलीस करत असून बालकल्याण समितीच्या निर्णयानंतर या जोडप्याला अटक केली जाणार आहे.
मुलासोबत घरातून रेस्क्यू केलेल्या श्वानांना डॉग शेल्टरमध्ये नेण्यासाठी
पोलिसांनी पुणे महानगरपालिकेशी (Pune Municipal Corporation (PMC) पत्रव्यवहार केला आहे.

 

Web Title :- Pune Crime | Annoying! The 11-year-old boy was kept at home by his parents with 22 dogs; As soon as he came out, the boy started behaving like a dog, the incident in Pune

 

हे देखील वाचा :

TP Scheme Property Card Pune | म्हाळुंगे- माण टीपीस्किम मधील शेतकर्‍यांना प्रॉपर्टी कार्डचे वाटप सुरू

Neha Bhasin Hot Video | ‘या’ प्रसिध्द गायिकेनं सुपरहॉट व्हिडिओ शेअर करून नेटकऱ्यांना दिला धक्का.. पाहा व्हायरल व्हिडिओ..

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी, पत्रात ‘या’ भाषेतील शब्दांचा वापर

 

Related Posts