IMPIMP

Pune Crime | कोयत्याने वार करुन फरार झालेले 3 आरोपी गजाआड, भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी

by nagesh
une Crime News | The four who kidnapped and abducted the contractor were chased and imprisoned

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने सपासप वार केल्याची घटना पुण्यात (Pune Crime) घडली होती. कोयत्याने वार करुन पळून गेलेल्या 3 आरोपींना खेडशिवापूर येथे अटक करण्यात आली. ही कारवाई भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील (bharti vidyapeeth police station) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे. ही घटना पुण्यातील (Pune Crime) कात्रज-कोंढवा रस्त्यावर (Katraj-Kondhwa road) शुक्रवारी (दि.5) रात्री 11.15 च्या सुमारास शिवशंभोनगर येथे घडली होती.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

अमित उर्फ हमिद चांदपाशा शेख (वय-21 रा. गोकुळनगर, कात्रज), विद्याधर उर्फ पप्पु सनातन नायक (वय-20 रा. शिवशंभोनगर, कात्रज), प्रसाद विजय गायकवाड
(वय-19 रा. प्रतिकनगर, गोकुळनगर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपींनी फिर्यादी किशोर रामचंद्र मोरे (रा. गुकुळनगर, कात्रज) यांचा मित्र रुपेश काकणु सगट (रा. आंबेगाव) याला पूर्वीच्या भंडणाच्या रागातून शिवीगाळ करुन
जिवे मारण्याच्या उद्देशाने लाथा बुक्क्यांनी व लाकडी बांबूने डोक्यात व पाठीवर मारहाण केली होती.
याप्रकरणी अमित शेख व त्याच्या दोन साथीदार यांचेविरुद्ध भारती पोलीस ठाण्यात गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे.

 

या गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाचे अधिकारी नितीन शिंदे (PSI Nitin Shinde) आरोपींचा शोध घेत असताना तपास पथकांतील अंमलदार सचिन पवार
(Sachin Pawar), अभिजीत जाधव (Abhijeet Jadhav) व राहूल तांबे (Rahul Tambe) यांना आरोपी खेडशिवापूर येथे लपून बसल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी आरोपींना खेडशिवापूर (Khedshivapur) येथून अटक केली.
आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
पोलीस उपनिरीक्षक अविनाश ढमे (PSI Avinash Dhame) यांनी आरोपींना अटक करुन त्यांची पोलीस कोठडी घेतली आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

ही कारवाई परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त सागर पाटील (DCP Sagar Patil), सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण (ACP Sushma Chavan),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर (Senior Police Inspector Jagannath Kalaskar), पोलीस निरीक्षक संगिता यादव (Police Inspector Sangita Yadav),
पोलीस निरीक्षक विजय पुराणिक (Vijay Puranik) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, पोलीस अंमलदार रविंद्र भोसले, रविंद्र चिप्पा,
गणेश सुतार, सचिन पवार, निलेश खोमणे, योगेश सुळ, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे, धनाजी धोत्रे, नवनाथ खताळ, सचिन गाडे,
आशिष गायकवाड, विक्रम सावंत, जगदीश खेडकर, शिवदत्त गायकवाड, प्रविण पिसाळ यांच्या पथकाने केली.

 

Web Title : pune crime | bharti vidyapeeth police station arrest 3 criminals

 

हे देखील वाचा :

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 57 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Sharad Pawar | शरद पवार यांनी पुरवला नातू आमदार रोहित पवारांचा ‘हट्ट’

Crime News | मध्यप्रदेशातील शिवसेना महिला नेत्याच्या घरात सुरु असलेल्या सेक्स रॅकटचा पर्दाफाश, महिला नेत्यासह 10 जण गजाआड

 

Related Posts