IMPIMP

Pune Crime | BMW कार स्वस्तात देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची 2 कोटींची फसवणूक; पुण्याच्या चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा

by bali123
Pune Crime | Businessman cheated of Rs 2 crore by offering cheap BMW Sports Car and Mercedes GLE 300D; Crime at Pune's Chathushrungi police station

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | बी एम डब्ल्यु स्पोर्ट कार (BMW Sports Car) व मर्सिडीज जी एल ई ३०० (Mercedes GLE 300D) या कार डिस्काऊंटमध्ये देतो, असे सांगून पुण्यातील एका व्यावसायिकाची तब्बल १ कोटी ९८ लाख रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याचे प्रकार समोर आला आहे़ (Pune Crime)

 

याप्रकरणी कुणाल राजेंद्र जैन Kunal Rajendra Jain (वय ३१, रा. कुमार कॉर्नर, कॉन्व्हेट स्ट्रिट) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (chaturshringi police station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अर्जुन राज Arjun Raj (रा. बेलापूर, नवी मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची सुपर सिलेक्ट नावाची कार खेरदी विक्रीचे शोरुम बाणेर येथे आहे.
आरोपी अर्जुन राज याने फिर्यादी यांच्या कंपनीस बी एम डब्ल्यु ७४० एम स्पोर्ट कार व मर्सिडीज जी एल ई ३०० या कार डिस्काऊंटमध्ये देतो,
असे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.

 

बी एम डब्ल्यु इन्फेनिटी कार्स प्रा. लि. मुंबई या कंपनीच्या कोटक महिंद्रा बँक खात्यावर १ कोटी ३३ लाख ५२ हजार ५०० रुपये
व मर्सिडीज टी अँड टी मोटर्स प्रा. लि. या कंपनीच्या एच डी एफ सी बँकेच्या बादरपूर,
नवी दिल्ली शाखेतील खात्यात ६५ लाख ४ हजार २७२ रुपये भरायला सांगितले.
त्यानंतर आरोपीने फिर्यादीचे किंग्ज कार केअर एलएल पी नावाची कंपनीची खोटी लेटरहेड तयार करुन
त्यावर कंपनीचा बनावट सही शिक्का मारुन ते खरे असल्याचे भासविले.
बीएमडब्ल्यु व मर्सिडीज शोरुममधून दोन्ही कार परस्पर घेऊन कार फिर्यादी यांना न देता.
त्या परस्पर इतरांना विकून कंपनीची फसवणूक (Pune Crime) केली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक पवार (API Pawar) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Businessman cheated of Rs 2 crore by offering cheap BMW Sports Car and Mercedes GLE 300D; Crime at Pune’s Chathushrungi police station

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

हे देखील वाचा :

Related Posts