IMPIMP

Pune Crime | अंमली पदार्थाची तस्करी करणारा पुण्यातील सुत्रधार गुन्हे शाखेकडून गजाआड

by nagesh
Pune Crime News | Drugs worth 11 lakh seized in two operations in Pune; Catha Idulis Khat, drugs seized for the first time, two foreign nationals arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | राजस्थानमधून पुण्यात अफीम (Opium) विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने (Pune Police Crime Branch) अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि.16) टिळक रोडवरील (Tilak Road) हिराबाग चौक (Hirabaug Chowk) येथे केली. आरोपीकडून 2 किलो 768 ग्रॅम अफीम, मोबाइल, रोकड असा एकूण 8 लाख 50 हजार रुपयांचा (Pune Crime) मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी आरोपीकडे सखोल चौकशी करुन पुण्यातील अंमली पदार्थाच्या तस्करीतील मुख्य सूत्रधाराला बेड्या ठोकल्या आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राजू प्रतापराम गुर्जर Raju Pratapram Gurjar (वय 22, सध्या रा. कुसाळकर चौक, जनवाडी, गोखलेनगर मुश रा. पाली राजस्थान), उमेद कानाराम देवासी Umaid Kanaram Dewasi (वय-28 रा. काळेपडळ, हडपसर, मुळ रा. राजस्थान) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) एनडीपीएस अ‍ॅक्ट (NDPS Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

राजू गुर्जर हा हिराबाग चौकात अफीम विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या बॅग तपासली असता त्यामध्ये अफीम सापडले. हे अंमली पदार्थ आणले कोठून, तो कोणाला हे विकणार होता, त्याचे साथीदार कोण आहेत याचा तपास पोलीस करीत असताना त्याने पुण्यातील सुत्रधार व साथीदाराची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी हडपसर येथील काळेपडळ येथे सापळा रचून अफीमचा पुरवठा करणारा पुण्यातील सुत्रधार उमेद देवासी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता हे अफीम राजस्थान येथून आणल्याची माहिती दिली. आरोपीला न्यायालयाने 25 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले (Senior Police Inspector Sandeep Bhosale),
उपनिरीक्षक संजय गायकवाड (PSI Sanjay Gaikwad), सुनील कुलकर्णी (PSI Sunil Kulkarni),
अजय जाधव (PSI Ajay Jadhav) पोलीस अंमलदार महेश बामगुडे, अयाज दड्डीकर, निलेश साबळे, शुभम देसाई,
अमोल पवार, इम्रान शेख यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी करत आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title :- Pune Crime | Drug smuggler nabbed by pune police Crime Branch

 

हे देखील वाचा :

Income Tax Return | कोणत्या लोकांना असते ITR Form-1 ची आवश्यकता, कशी आहे तो ऑनलाइन भरण्याची पद्धत; येथे जाणून घ्या पूर्ण डिटेल्स

Pune Crime | शिवसेनेचे माजी खा. शिवाजी आढळराव पाटलांना हातपाय मोडण्याची धमकी, 17 जणांवर FIR

Multibagger Penny Stocks | जलद रिटर्न ! 36 पैशांचा शेअर झाला 2380 रुपयांचा, 1 लाख लावले असते तर 65 कोटी मिळाले असते!

 

Related Posts