IMPIMP

Pune Crime | आई, आजीने अल्पवयीन मुलीची घरीच केली प्रसृती; मांजरी, कुत्र्यांमुळे उघड्यावर टाकलेल्या अर्भकाचा जीव वाचला

by nagesh
Pune Crime | Mother, grandmother brought up the minor girl at home; Baby saved by cats and dogs crime news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime |  इंस्टाग्रामवरुन (Instagram) झालेल्या ओळखीतून एका अल्पवयीन मुलगी (Minor Girl) गर्भवती (Pregnant) राहिली. आईने हा प्रकार सर्वांपासून लपवून ठेवला. मुलीची घरीच प्रसृती केली. मात्र, लोकलज्जेस्तव नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला त्यांनी कचर्‍याजवळ टाकून दिले. तेव्हा मांजर आणि कुत्र्यांमुळे इमारतीतील लोकांना हे अर्भक दिसले. उत्तमनगर पोलिसांनी (Uttamnagar Police) तातडीने हा अर्भकाला (Infant) हॉस्पिटलमध्ये नेल्याने त्याचा जीव वाचला. राज्य महिला आयोगाने (State Commission for Women) याची दखल घेऊन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी पोस्कोसह (Pocso Act) दोन गुन्हे दाखल केले आहेत.

 

याबाबतची माहिती अशी, कोंढवे धावडे परिसरातील एका १७ वर्षाच्या मुलीचे इंस्टाग्रामवरुन एका तरुणाशी ओळख झाली. त्यातून त्यांचे शारीरीक संबंध (Physical Relationship) निर्माण होऊन मुलगी गर्भवती राहिली. ही बाब तिच्या आईला व आजीच्या लक्षात आले. परंतु, त्यांनी ही बाब सर्वांपासून लपवून ठेवली. मुलीचे पोट दिसू लागल्यावर तिला पाळीचा त्रास असल्याने पोट फुगले असल्याचे इतरांना सांगितले. शनिवारी रात्री या मुलीची त्यांनी घरीच प्रसृती केली. त्यानंतर त्यांनी सोसायटीच्या पार्किंगच्या मागील बाजूला तोडलेल्या झाडाच्या खोडामध्ये या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला टाकून दिले. रात्रीच्या वेळी कुत्री व मांजर विचित्र का ओरडत आहे, हे ऐकून सोसायटीतील काही जणांनी तिकडे जाऊन पाहिल्यावर एक बाळ आढळून आले. त्यांनी तातडीने उत्तमनगर पोलिसांना यांची माहिती दिली. महिला पोलिसांनी या बाळाला ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले. वेळीच लक्षात आल्याने बाळाचे प्राण वाचविण्यात यश आले. (Pune Crime)

 

इकडे या मुलीच्या प्रसृतीनंतर रक्तस्त्राव खूप होऊ लागल्याने तिच्या आईने मुलीला लवळे हॉस्पिटलमध्ये (Lavale Hospital) नेले. तेथे तिच्यावर उपचार करुन तिचा जीव वाचविण्यात आला. हॉस्पिटलकडून ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पौड पोलिसांनी (Poud Police) ही माहिती उत्तमनगर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब घेतल्यावर हा सर्व प्रकार समोर आला.

 

पोलिसांनी या मुलीसह तिच्या आईवर गुन्हा दाखल केला आहे.
तसेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिला गर्भवती केल्याप्रकरणी
एका तरुणावर पोस्को अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | Mother, grandmother brought up the minor girl at home; Baby saved by cats and dogs crime news

 

हे देखील वाचा :

Shahu Chhatrapati | कोर्टबाजीत अर्थ नाही, आता आरक्षण मिळाले नाही तर…; मराठा आरक्षणावरून शाहू छत्रपतींचं मोठं विधान

Nana Patole | हे दळभद्री सरकार, यांच्या नाकर्तेपणामुळे शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात, नाना पटोले यांचा घणाघात

CM Eknath Shinde | राज ठाकरे, वर्षा गायकवाड CM शिंदेंच्या भेटीसाठी ’वर्षा’वर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

Eknath Khadse | भाजपा आमदाराची एकनाथ खडसेंवर टीका, पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन म्हणजे जेलमध्ये जाण्याचा सराव

 

Related Posts