IMPIMP

Pune Crime | पोलिसांविरुद्ध सोशल मीडियावर अश्लील मजकूर, 9 जणांवर एफआयआर

by nagesh
Pune Crime | Obscene text on social media against police, FIR against 9 people

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | बेशिस्तपणे वाहन लावणाऱ्यांवर पुणे वाहतूक शाखेकडून कारवाई केली जाते. वाहतूक पोलिसांनी
एका दुचाकीवर कारवाई केल्यानंतर सोशल मीडियावर अश्लील मजकूर आणि ध्वनिचित्रफित व्हायरल करणाऱ्या आणि त्यावर अश्लील कमेंट
करणाऱ्या 9 जणांवर गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत वाहतूक शाखेत कार्यरत असणाऱ्या महिला पोलिसाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विजय सागर (मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर), प्रशांत पाटील, परिक्षित याल्लीर, विजय चौगुले, प्रज्वल सोनवणे, सचिन वाबळे, सतीश काळे, दत्तात्रय पटेरे, गणेश मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. विजय सागर ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते आहेत. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 27) वाहतूक शाखेकडून बेशिस्त वाहने लावणाऱ्यांवर कारवाई केली जात होती. त्यावेळी विजय सागर यांच्या दुचाकीवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. सागर यांची दुचाकी क्रेनच्या साह्याने उचलण्यात आली. यानंतर सागर यांनी पोलीस करीत असलेल्या कारवाईचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. त्यानंतर त्यांनी ध्वनिचित्रफित सोशल मीडियावर व्हायरल केली. यावर आठ जणांनी अश्लील भाषेत कमेंट केल्या. हा प्रकार फिर्यादी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे विभाग) विक्रम गौड करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | Obscene text on social media against police, FIR against 9 people

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | नवस फेडण्यासाठी दगडूशेठ गणपतीला चल असे म्हणत महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग

CM Eknath Shinde | उदयनराजे भोसलेंच्या अनुपस्थितीवर थेट बोलण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाळले; म्हणाले…

Pune Crime | गोळीबार झाल्याचा बनाव करुन व्यावसायिकाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी; 80 लाख रुपये खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगारावर गुन्हे शाखेकडून FIR

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डॅमेज कंट्रोल मोडवर?; प्रतापगडावर शिवप्रताप दिनानिमित्त म्हणाले – ‘जर राज्यात परिवर्तन झालं नसतं, तर…’

 

Related Posts