IMPIMP

Pune Crime | बांधकाम व्यावसायिकासह 37 जणांना गंडा घालणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Lonikand Police Station - Fraud of a senior citizen by using fake purchase documents on the pretext of renting a place

पिंपरी :  सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक (Stock Trading Investment) केल्यास दरमहा जास्त फायदा मिळवून देण्याचे आमिष (Lure) दाखवून अनेकांची फसवणूक (Cheating) करणाऱ्या रेकॅटचा पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) पर्दाफाश केला आहे. बांधकाम व्यावसायिकासह (Builders In Pune) 37 जणांची 8 कोटी 29 लाख 75 हजार 803 रुपयांची फसवणूक केल्याचे समोर (Pune Crime) आले आहे. हा प्रकार पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथे 1 सप्टेंबर 2021 ते 27 जानेवारी 2022 या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी एकाला अटक (Arrest) करण्यात आली असून त्याच्याकडून 8 लाख 50 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेने (Pimpri Chinchwad Police Crime Branch) केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सागर संजय जगदाळे Sagar Sanjay Jagdale (वय-28 रा. रावेत) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह जय मावजी (Jai Mawji), निजय मेहता (Nijay Mehta), निकुंज शहा (Nikunj Shah), निलेश शांताराम वाणी (Nilesh Shantaram Vani) यांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. महेश मुरलीधर शिंदे Mahesh Muralidhar Shinde (वय-44 रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याबाबत 27 जानेवारी 2022 रोजी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश शिंदे हे बांधकाम व्यावसायिक आहेत. इन्फिनॉक्स कॅपिटल कंपनीच्या (Infinix Capital Company) शेअर ट्रेडींग ब्रोकर कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा फायदा करुन देण्याचे आमिष आरोपींनी दाखवले. परंतु गुंतवणूक केलेल्या रकमेवर आरोपींनी दरमहा कोणतीही रक्कम शिंदे यांना दिली नाही. तसेच गुंतवलेली रक्कम परत न करता कंपनीच्या मेटा ट्रेडर फोर (Metatrader Four) या अ‍ॅपवर बनावट व खोटा इलेक्ट्रॉनिक अभिलेख (Electronic Record) तयार करुन फिर्यादीची व इतरांची 8 कोटी 29 लाख 75 हजार 803 रुपयांची आर्थिक फसवणूक केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आला. इन्फिनॉक्स कॅपिटल कंपनीचे रावेत याठिकाणी कार्यालय आहे. येथूनच सर्व कामकाज होत असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. कंपनीच्या संचालक व इतरांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर ही आरोपी सागर जगदाळे हा इतर आरोपींसोबत मोबाईल व इतर माध्यमांद्वारे संपर्कात असल्याचे तपासात समोर आले.

 

हवाला कनेक्शन
वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना गुंतवणूक करण्यास सांगून आरोपी जगदाळे हा फसवणूक करत होता.
टॅब, दोन मोबाईल, बँक पासबुक, बँक चेकबुक व इतर कागदपत्रे त्याच्याकडे सापडली आहेत.
तसेच हवाला करीता वापरलेल्या 10 रुपयाच्या चलनी नोटा देखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

 

नोकरी करत असताना अनेकांना गंडा
आरोपी जगदाळे हा सेल्समन (Salesman) म्हणून काम करत असताना त्याने सॉफ्टवेअर टेस्टिंगचे (Software Testing) काही शॉर्ट कोर्सेस केले.
यानंतर तो शेअर ट्रेडिंग मधील कंपनीत नोकरीसाठी आला. ही नोकरी करत असताना त्याने लोकांना गुंतवणुकीचे आमिष दाखवले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

देशात अनेकांची फसवणूक
इन्फिनॉक्स कॅपिटल कंपनीमार्फत फॉरेक्स ट्रेडिंग द्वारे जास्त परतावा देतो, असे आरोपींकडून सांगण्यात येत होते.
पिंपरी-चिंचवड, पुणे व देशभरातील नागरिकांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
यातील 37 जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. फसवणूक झालेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
ज्यांची फसवणूक झाली आहे, अशा व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

Web Title :- Pune Crime | racket that exposed 37 people including a builder fraud cheating pimpri chinchwad pune

 

हे देखील वाचा :

Chennai Super Kings | चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का ! धोनीच्या चेन्नईचा 14 कोटींचा मोहरा आयपीएलला मुकणार?, जाणून घ्या!

Adinath Cooperative Sugar Factory | शेतकऱ्यांचा रोहित पवारांना धक्का? ‘तो’ कारखाना बारामती ॲग्रोला देण्याचा ठराव रद्द!

Gully Boy Fame Rapper Dharmesh Dies | ‘गली बॉय’ मधील रॅपरला 4 महिन्यात आले दोन हार्ट अटॅक, धर्मेशची आई म्हणाली – ‘त्याला वाचविण्यासाठी मी काहीही करू शकले नाही…’

 

Related Posts