IMPIMP

Pune Crime | रिक्षाचालकावर ब्लेडने वार करुन तिघा प्रवाशांनी लुबाडले; मार्केटयार्ड परीसरातील घटना

by nagesh
Pune Crime | Rickshaw driver stabbed with blade and robbed by three passengers; Incidents in the Marketyard area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime | प्रवासी म्हणून बसलेल्या चोरट्यांनी रिक्षाचालकाला (Rickshaw Driver) धमकावून त्याच्यावर ब्लेडने वार करुन लुबाडल्याचा प्रकार समोर आला आहे. या तिघांपैकी कुमार राम कांबळे Kumar Ram Kamble (वय २१, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) याला अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत रिक्षाचालक अजयकुमार मुन्नालाल सरोज Ajay Kumar Munnalal Saroj (वय २५, रा. कात्रज) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १५८/२२) दिली आहे. ही घटना मार्केटयार्डमधील बैलबाजारात गुरुवारी रात्री दहा वाजता घडली. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षाचालक आहेत. तिघा जणांनी बैलबाजार येथे हात दाखवून रिक्षा थांबविली. प्रवासी असल्याचे समजून सरोज यांनी रिक्षा थांबविली. तिघे रिक्षात बसल्यावर त्यातील एकाने फिर्यादी यांना तुझ्याकडे असलेले सर्व पैसे काढून दे, नाही तर जीवाने जाशील अशी धमकी दिली. तेव्हा सरोज याने त्यांना पैसे नाहीत, असे म्हटले. रिक्षात बसलेल्या इतर दोघांनी फिर्यादी यांना पकडून ठेवले. त्यांच्यातील एकाने त्याच्याकडील ब्लेडने फिर्यादीच्या छातीवर, पोटावर, हातावर मारुन जखमी केले.
एकाने चावा घेतला. खिशातील ३ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर रिक्षा घेऊन ते पळून गेले.
ही रिक्षा आंबेडकर नगर रिक्षा स्टँड येथे नंतर मिळून आली.

 

या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी शोध घेतला असता त्यांना कुमार कांबळे व त्याच्या साथीदारांनी हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी कांबळे याला पकडले असून सहायक पोलीस निरीक्षक कांबळे
(Assistant Police Inspector Kamble) तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | Rickshaw driver stabbed with blade and robbed by three passengers; Incidents in the Marketyard area

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | दिलेल्या यातनांची जाणीव होणे हा चांगला बदल पण…, मोहन भागवतांच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया

Nashik Fire Incidents | शनिवार नाशिकसाठी आगीच्या घटनांचा दिवस, दोन प्रवासी बसने पेट घेतल्यानंतर सिलेंडरच्या ट्रकनं घेतला पेट, रॉकेट सारखे हवेत उडाले सिलेंडर

Ajit Pawar | आई-वडिलांना शिव्या देण्याच्या वक्तव्यावरून अजित पवारांनी घेतला चंद्रकांत पाटलांचा समाचार

 

Related Posts