IMPIMP

Benefits Of Sunlight | सूर्यप्रकाश, Vitamin D व्यतिरिक्त ‘या’ फायद्यांबद्दल जाणून घेणे आवश्यक

by nagesh
Benefits Of Sunlight | benefits of sunlight for health sunlight for better sleep and mood

सरकारसत्ता ऑनलाइन – Benefits Of Sunlight | निरोगी स्वास्थ्यासाठी दररोज अनेक प्रकारचे पोषक घटक (Nutrients) आवश्यक असतात. व्हिटॅमिन डी (Vitamin D) त्यापैकी एक आहे. हाडांना निरोगी ठेवण्याबरोबरच पेशी आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. यासाठी या जीवनसत्त्वाची गरज असते. सूर्यप्रकाशातून ’ड’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात मिळते. म्हणूनच दररोज सकाळच्या हलक्या उन्हात चालण्याचा सल्ला दिला जातो. सूर्यप्रकाश हा केवळ व्हिटॅमिन-डीसाठीच नव्हे, तर इतरही अनेक प्रकारे शरीरासाठी फायदेशीर मानला जातो. दररोज सूर्यप्रकाशात थोडा वेळ घालविण्यामुळे तुमच्यातील सक्रियता वाढते (Benefits Of Sunlight).

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शहरी भागातील लोकांना दररोज पुरेसा सूर्यप्रकाश (Sunlight) मिळत नसल्याने आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होण्याचा धोका वाढल्याचे अनेक अभ्यासांतून दिसून आले आहे. तरुण वयातच लोकांना हाड आणि त्वचेचा (Bone And Skin) त्रास होऊ लागला आहे. तसे पाहता जास्त वेळ सूर्यप्रकाशही हानिकारक ठरू शकतो. त्यातून निघणार्‍या अतिनील किरणोत्साराच्या अतिसेवनामुळे त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. दररोज उन्हाच्या चटक्याच्या हलक्या उन्हात चालण्याची सवय लावा, हे आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकत. सूर्यप्रकाशामुळे होऊ शकणार्‍या विविध आरोग्यविषयक फायद्यांविषयी सविस्तर माहिती घेऊया (Benefits Of Sunlight).

 

हाडांसाठी फायदेशीर (Beneficial For Bones) :
हाडांना निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन-डीची गरज असते. सूर्यप्रकाशातून डी हे जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर मिळते. संशोधनात असे दिसून आले आहे की, सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर आपले शरीर व्हिटॅमिन डी तयार करते. व्हिटॅमिन-डी शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण योग्य राखण्यास उपयुक्त आहे. कॅल्शियम हाडांना बळकटी देण्यासाठी, पातळ होण्यास आणि सहजपणे तुटण्यास प्रतिबंध करण्यास उपयुक्त आहे.

 

अभ्यासात असे दिसून आले आहे की, उन्हात वेळ घालवल्यामुळे आपला मूड सुधारतो. सूर्यप्रकाशामुळे तुमच्या शरीरात सेरोटोनिनची पातळी वाढते. सेरोटोनिन एक न्यूरोट्रांसमीटर आहे. जो मूड आनंदी ठेवण्यासाठी उपयुक्त मानला जातो. मन शांत आणि एकाग्र ठेवण्यात याचा फायदा होतो. काही संशोधन असे सूचित करतात की हिवाळ्याच्या महिन्यांत सूर्यप्रकाश नसल्यामुळे लोकांच्या मनःस्थितीशी संबंधित विकारांचा धोका वाढतो.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दीर्घायुष्य मिळवण्याचे मार्ग (Ways To Achieve Longevity) :
३०,००० स्वीडिश स्त्रियांवर केलेल्या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, जे लोक उन्हात जास्त वेळ घालवतात ते सहसा खोल्यांमध्ये राहणार्‍यांपेक्षा जास्त काळ जगण्याची शक्यता असते. तथापि, वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की याची पुष्टी करण्यासाठी अधिक संशोधन आवश्यक आहे.

 

रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक (Essential For Immune System) :
सूर्यप्रकाशाचा संपर्क शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीस चालना देण्यासाठी खूप उपयुक्त ठरतो.
संशोधनात असे दिसून आले आहे की व्हिटॅमिन-डी आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी महत्त्वपूर्ण आहे
आणि सूर्यप्रकाशाच्या सतत संपर्कात राहिल्यास आपल्याला ते अधिक चांगले राखण्यात यशस्वी होण्यास मदत होते.
निरोगी रोगप्रतिकारक शक्तीमुळे शस्त्रक्रियेनंतर आजारपण, संसर्ग, विशिष्ट प्रकारचे कर्करोग, कोरोना संसर्ग इत्यादींचा धोका कमी होण्यास मदत होते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Benefits Of Sunlight | benefits of sunlight for health sunlight for better sleep and mood

 

हे देखील वाचा :

Pune Crime | छळाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह 7 जणांवर कौटुंबिक हिंसाचाराखाली गुन्हा दाखल

Parenting Tips | मुलाच्या नाकावर राग कायम राहिला तर त्याच्याशी ‘या’ पध्दतीनं वागा, दिसून येईल बदल

Solapur-Hyderabad Highway News | सोलापूरमध्ये पुण्यातील कारचा आणि ट्रकचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू; 5 जण गंभीर जखमी

 

Related Posts