IMPIMP

Pune MNS | …. तर मलाही वसंत मोरेंची गरज नाही; नीलेश माझिरे यांची ‘त्या’ वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया

by nagesh
Pune MNS | mns leader nilesh mazire hits back vasant more tatya in pune maharashtra

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   मागील काही दिवसांपासून पुणे मनसेमधील (Pune MNS) अंतर्गत वाद वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे.
मनसेप्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मनसे माथाडी कामगार सेनेचे पुणे (Pune MNS) जिल्हाध्यक्ष नीलेश माझिरे (Nilesh
Mazire) यांना हटवले. त्यानंतर माझिरे यांनी आपण व आपले 400 कार्यकर्ते पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले होते. या राजकीय वादामुळे वसंत मोरे
(Vasant More) आणि नीलेश माझिरे यांच्यात कटुता निर्माण झाली आहे. माझिरे यांनी पक्ष सोडल्यानंतर आता माझा त्यांच्याशी संबंध नाही, असे वक्तव्य वसंत मोरे यांनी केले होते. हे वक्तव्य ऐकून माझिरे यांनी मलादेखील वसंत मोरे यांची गरज नसल्याचे म्हटले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

माझिरे म्हणाले, वसंत मोरे यांचे वक्तव्य माझ्या वाचनात आले. मला त्यांना विचारायचे आहे की, आपली मैत्री संपलेय का, पक्षात असो किंवा नसो, आपली मैत्री राहील, हा तुमचाच शब्द होता. त्यामुळे वसंत मोरे यांचे वक्तव्य ऐकून वाईट वाटले. मात्र, आता तुमच्याच वक्तव्याचा धागा पकडून सांगतो, वसंत मोरे यांना माझी गरज नसेल तर मलाही त्यांची गरज नाही. (Pune MNS)

 

ते म्हणाले, ज्यावेळी तात्या अडचणीत होते तेव्हा मी त्यांच्यासोबत थांबलो होतो. मात्र, आता जेव्हा मी अडचणीत आहे, तेव्हा तात्यांनी असे बोलणे चुकीचे आहे. तात्यांनी मला फोन केला होता की, तुझा फोन बंद ठेव, महाराष्ट्र सैनिक बनून राहा. मात्र, त्यासाठी मला काहीतरी कारण हवे होते. राज ठाकरे यांनी माझे पद काढून घेतल्याचे वाईट वाटत नाही. कारण महाराष्ट्र सैनिक माझ्या पाठीशी आहेत. वसंत मोरे यांनी संबंध तोडायचे ठरवले असतील तर मीदेखील का संबंध जपू.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी माझिरे यांनी संघटनेतील अंतर्गत राजकारणावर नाराजी व्यक्त करत पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र, त्यावेळी राज ठाकरे यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर माझिरे यांनी निर्णय बदलला होता.
त्यावेळीदेखील वसंत मोरे यांनीच नीलेश माझिरे यांना शिवतीर्थावर नेले होते.
तेव्हा राज ठाकरे यांनी माझिरे यांना माथाडी कामगार सेनेचे पुणे जिल्हाध्यक्षपद दिले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune MNS | mns leader nilesh mazire hits back vasant more tatya in pune maharashtra

 

हे देखील वाचा :

Jitendra Awhad | ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या दृश्यावर जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप; म्हणाले – “मराठी माणसाला येड्यात काढताहेत”

Sanjay Raut | ‘मंत्री महोदय, ही धमकी समजायची का?’ – संजय राऊत

Pune News | शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या विचारधारेचा कडेलोट

Supreme Court Mobile App 2.0 | खटल्यांची सद्यःस्थिती जाणून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे अ‍ॅप

 

Related Posts