IMPIMP

Pune News | गरुड गणपती आणि गजानन मंडळ पालखीतून विसर्जन मिरवणूक

by bali123
Pune News | Immersion procession from Garud Ganpati and Gajanan Mandal Palkhi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | अनंत चतुर्दशीनिमित्त गणपती बाप्पाला जड अंतःकरणाने रविवारी निरोप देण्यात आला. शहरात रविवारी गणपतीमय वातावरण होते. सार्वजनिक मंडळांनी मंडपात हौद उभारून किंवा नजीकच्या महापालिकेच्या (Pune News) हौदात गणपतीचे विसर्जन केले.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

लक्ष्मी रस्त्यावरील श्री गरुड गणपती मंडळ (Shri Garud Ganpati Mandal) आणि श्री गजानन मंडळ (Shri Gajanan Mandal) यांच्या गणपतींचे पालखीतून एकत्रितपणे मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले. मंडपापासून मोदी गणपती (Modi Ganpati) जवळील वाहनतळ येथील हौदापर्यंत ही पालखी कार्यकर्त्यांनी खांद्यावरून वाहिली. पालखीतून निघालेल्या मिरवणुकीने लोकांचे लक्ष वेधले होते.मिरवणुकीत महिलांचा उत्साही सहभाग (Pune News) होता. श्री गरुडगणपती मंडळाचे अध्यक्ष सुनिल कुंजीर (Sunil Kunjir), कार्याध्यक्ष कैलास कांबळे (Kailas Kamble), श्री गजानन मंडळाचे अध्यक्ष राकेश गाडे (Rakesh Gade)आदी मिरवणुकीत सहभागी झाले होते. शासकीय नियम पाळण्यासाठी मिरवणुकीत वाद्य पथके टाळली होती, उत्साही पण शिस्तबद्धरित्या गणरायाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला.

Web Titel :- Pune News | Immersion procession from Garud Ganpati and Gajanan Mandal Palkhi

Related Posts