IMPIMP

Pune News | पुण्यातील निर्बंधाबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

by nagesh
Parambir Singh | Search for Parambir Singh begins with the help of central government, Home Minister Dilip Walse Patil informed

पुणे (Pune) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Pune News | पुण्यात गेली एक दोन महिन्यापूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक होता. मात्र, आता पुण्यातील (Pune News) कोरोनाही परिस्थिती आटोक्यात आली आहे. त्यात पुणे शहरात लसीकरण देखील अधिक गतीने सुरु आहे. सध्या शहरात सर्व व्यवहार दुपारी 4 वाजेपर्यंतच सुरु आहे. चार नंतर संचारबंदी आहे. मात्र कोरोनाची परिस्थिती नियंत्रात येत असल्याचे पाहता सर्व व्यापाऱ्यांकडून दुकानांची वेळ वाढवण्याची मागणी होतेय. यावरून पुण्यातील निर्बंधासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी एक महत्वाची माहिती दिलीय.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

गृहमंत्री वळसे पाटील बोलताना म्हणाले की, ‘कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी स्तर तीनमध्ये असणाऱ्या राज्यातील 11 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात पुणे जिल्ह्याचा देखील समावेश आहे. यावरून अद्याप निर्बंध शिथिल करण्याला मान्यता दिलेली नाही. तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं बोलणं झाल आहे. पुण्याला काही प्रमाणात सूट देण्याबाबत सुरूय. याबाबत 2 दिवसात निर्णय घेण्यात येईल असं गृहमंत्री वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, पुण्यातील लसीकरणाबाबत पुणे जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला आहे. ते वाढवण्याचा देखील निर्णय घेण्यात आलाय. पुण्यासाठी अधिक कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देणार आहोत. असं देखील गृहमंत्री पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी सांगितलं आहे.

 

 

निर्बंधाबाबत अजित पवार काय म्हणाले आहेत ?

कोरोनामुळे अनेक लोक घरूनच काम करत आहेत. सोमवार ते शुक्रवार काम करतात, त्यांना खरेदी
करता वेळ पाहिजे. त्या अनुषंगाने शनिवार, रविवार जी सुट्टी आपण देतो त्यात रविवारी सुट्टी द्यावी आणि
शनिवारी व्यवहार चालू राहावे, असा निर्णय घेण्याचा विचार करत आहोत. परंतु, त्यावेळी सर्व नियमांचे काटेकोर पालन झालेच पाहिजे, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.

 

 

Web Title : pune news | will there be relief pune restrictions specific information given dilip walse patil

 

हे देखील वाचा :

Kolhapur News | कोल्हापूर दौऱ्यादरम्यान CM उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांसमोर, भेटीमागचं कारण समोर

Amazon App Quiz July 30 | अमेझॉन अ‍ॅपवर 5 प्रश्नांचे उत्तर देऊन जिंकू शकता 20 हजार रुपये, जाणून घ्या उत्तर

Pimpri Crime | उद्योजक नानासाहेब गायकवाड आणि साथिदारांवर सावकारीचा व खंडणीचा गुन्हा दाखल

 

Related Posts