IMPIMP

Kolhapur News | कोल्हापूर दौऱ्यादरम्यान CM उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांसमोर, भेटीमागचं कारण समोर

by nagesh
Kolhapur News | uddhav thackeray devendra fadnavis meeting in kolhapur know what was the reason behind it

कोल्हापूर न्यूज (Kolhapur News): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online):   Kolhapur News | गेल्या दोन आठवड्यापासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. या मुसळधार पावसाने पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) असणाऱ्या जिल्ह्यांना पूर आला. अनेक घरात पाणी घुसले. अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळे हलविण्यात आलीत. या पार्श्वभूमीवर अनेक सत्ताधारी आणि विरोधक नेते जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पुरग्रस्तांची पाहणी करण्यासाठी सांगली, कोल्हापूर दौरे करत आहेत. यातच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे कोल्हापुरात (Kolhapur News) परस्पर समोर आले आहेत. दोन्ही नेत्यात त्यावेळी काही चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. मात्र त्या भेटीमागचं कारण पुढं आलंय.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

आज (शुक्रवारी) राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur District) अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आले आहेत.
त्यात कोल्हापुरातील शाहूपूरी येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करत होते.
त्याच परिसरात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देखील पाहणी करत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना मिळाली.
नंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना निरोप दिला की फडणवीस यांना मी तीथेच भेटतो.
नंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर (Shiv Sena Secretary Milind Narvekar) यांनी देवेंद्र फडणवीस यांना निरोप देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर भेट करून दिली आहे.
या भेटीत केवळ पूरग्रस्तांच्या प्रश्नांवर चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे.

 

 

दरम्यान, कोल्हापुरातील शाहूपुरी येथील लोकांशी संवाद साधतेवेळी देवेंद्र फडणवीस हे देखील तेथून जात होते. यादरम्यान दोन्ही नेते हे परस्पर समोर आले.
या दोन्ही नेत्यांत काहीतरी चर्चा झाल्याचं फोटो दृश्यामध्ये दिसत आहे.
मात्र, तेथे गर्दी आणि आवाजामुळे तेथील नेमकी चर्चा काय झाली? याची माहिती समजली नाही.
परंतु, यांच्यात झालेल्या चर्चेवरून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

 

 

 

Web Title : Kolhapur News | uddhav thackeray devendra fadnavis meeting in kolhapur know what was the reason behind it

 

हे देखील वाचा :

Amazon App Quiz July 30 | अमेझॉन अ‍ॅपवर 5 प्रश्नांचे उत्तर देऊन जिंकू शकता 20 हजार रुपये, जाणून घ्या उत्तर

Pimpri Crime | उद्योजक नानासाहेब गायकवाड आणि साथिदारांवर सावकारीचा व खंडणीचा गुन्हा दाखल

Pune Police | पुणे शहरासह जिल्ह्यात वाहन चोरी करणारे त्रिकुट गजाआड, 10 दुचाकीसह रिक्षा जप्त

 

Related Posts