IMPIMP

Pune Yerawada Crime | येरवड्यात पार्क केलेली दुचाकी जाळली, सराईत गुन्हेगाराला अटक

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Yerawada Crime | किरकोळ कारणावरुन पुणे शहरात दुचाकीची तोडफोड (Bike Vandalism) करुन जाळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. येरवड्यात दहशत पसरवण्यासाठी पार्क केलेली दुचाकी जाळल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.2) रात्री पावणे दहाच्या सुमारास नवी खडकी, यशवंतनगर येथे घडला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Yerawada Police) एका सराईत गुन्हेगाराला (Criminal On Police Records) अटक केली आहे.

याबाबत विकास कुमार लवगिरे (वय-42 रा. नवी खडकी, यशवंतनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सुमित सुरेश गवळी (वय-28 रा. ताडीगुत्ता झोपडपट्टी, येरवडा, पुणे) याच्यावर आयपीसी 435 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत तीन गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसा, फिर्य़ादी यांनी त्यांची दुचाकी राहत्या घरासमोर पार्क केली होती. आरोपीने फिर्यादी यांच्या दुचाकीचे नुकसान करण्याच्या उद्देशाने दुचाकी पेटवली. यामध्ये दुचाकी जळून खाक झाली. तसेच गाडीच्या डिकीमध्ये असलेले दोन मोबाईल जळून फिर्य़ादी यांचे नुकसान केले. फिर्य़ादी यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.

अल्पवयीन मुलाला चामडी पट्ट्याने मारहाण

खराडी (Kharadi) : पिपाणी वाजवल्याच्या कारणावरून एका 16 वर्षाच्या मुलाला शिवीगाळ करुन चामडी पट्ट्याने बेदम मारहाण करुन जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना खराडी येथील इऑन स्कूल जवळ मंगळवारी (दि.2) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. याबाबत सोहम मारुती घोरपडे (वय-16 रा. थिटे वस्ती, खऱाडी) याने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police) फिर्याद दिली आहे. यावरुन ऋषिकेश शहाजी थोरात (वय-36 रा. खराडी) याच्यावर आयपीसी 324, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Unmesh Patil BJP – Shivsena UBT | जळगाव: भाजपचे खासदार उन्मेष पाटील ‘उबाठा’मध्ये जाणार

Related Posts