IMPIMP

सचिन-गांगुलीची ओपनिंग जोडी कशी बनली?, Ex कॅप्टननं सांगितलं यामागचं गुपित

by bali123
sourav ganguly reveals how he become opening batsman sachin tendulkar

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वांत यशस्वी ओपनिंग जोडीचा उल्लेख करायचा झाला तर यामध्ये सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली sourav ganguly या जोडीचा उल्लेख आवर्जून केला जातो. भारतीय संघाच्या या दोन सलामीवीरांनी भारतीय संघाला अनेक सामन्यात चांगली सुरुवात करून देत विजय मिळवून दिला आहे. या दोघांनी केलेल्या अनेक भागीदाऱ्या अविस्मरणीय ठरल्या आहेत. या जोडीने अनेक विक्रम केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, सचिन आणि गांगुली हे दोघे भारतीय संघाचे सलामीवीर फलंदाज म्हणून ओळखले जात नव्हते. सचिन आणि सौरव sourav ganguly या दोघांची सलामीवीर जोडी म्हणून नेमका विचार केव्हा आणि कसा झाला ? याबाबत स्वत: माजी कर्णधार सौरव गांगुलीने सांगितले आहे.

गांगुली मधल्या फळीतील खेळाडू
सौरव गांगुली याने 1996 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने इंग्लंडच्या लॉर्ड्स स्टेडियमवर कसोटी क्रिकेटमधून पदार्पण केले. पदार्पणातच त्याने खणखणीत शतक ठोकले होते. एकदिवसीय सामन्यात सलामीवीर फलंदाज होण्यापूर्वी सौरव मधल्या फळीतील फलंदाज होता. त्याने 10 सामने मधल्या फळीत खेळले होते. 1996 मध्ये टायटन कप स्पर्धेत सचिन आणि सौरव यांची जोडी पहिल्यांदाच मैदानावर उतरली.

सचिनच्या सल्ल्याने सौरव सलामीला
सौरव गांगुली याने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्याने आपण सलामीवीर फलंदाज कसे बनलो आणि सचिन आणि माझी सलामीची जोडी कशी जमली याचं रहस्य सांगितलं. सचिनने मला ओपनिंग कर असे सांगितल्याचे सौरवने सांगितले. सौरवने सांगितले, एकदिवसीय सामन्यामध्ये सलामी करण्यापूर्वी मी मधल्या फळीत फलंदाजी करत होतो. पण एकदा सचिन माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला की, कसोटीमध्ये तू तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतोस, आपल्याकडे आता सलामीसाठी फलंदाज नाही. मग तू ओपनिंग कर. त्याने असे म्हणताच मी लगेच हो म्हणालो आणि त्या दिवसापासून मी आणि सचिन सलामीला येऊ लागलो.

सचिन-सौरव जोडी 136 वेळा सलामीला
सचिन आणि सौरव यांनी पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेविरोधात सलामीसाठी फलंदाजी केली. या सामन्यामध्ये या दोघांनी अर्धशतकं ठोकली. तसेच पहिल्या विकेटसाठी 126 धावांची भागीदारी केली. भारताने हा सामना गमावला असला तरी भारतीय संघाला सचिन आणि सौरवच्या रूपाने सलामीची जोडी मिळाली होती. यानंतर या जोडीने तब्बल 136 सामन्यांमध्ये सलामीला फलंदाजी केली. यामध्ये दोघांनी मिळून 49.32 च्या सरासरीने 6,609 धावा केल्या आहेत. दोघांनी मिळून 21 शतकं आणि 23 अर्धशतकीय भागीदारी रचली आहे. सचिन तेंडुलकर यानेदेखील त्याच्या करिअरची सुरुवात मधल्या फळीतील फलंदाज म्हणूनच केली होती. त्यानंतर तो सलामीवीर म्हणून खेळू लागला होता.

Mithali Raj @10,000 : मिताली राजने घडवला इतिहास, रेकॉर्ड क्विनचे नवे विक्रम, मोडणे सहज शक्य नाही, ठरली पहिली भारतीय

पुण्यात लॉकाडाउन नाहीच ! उपाययोजनांची कडक अंमलबजावणी

Mukesh Ambani Bomb Scare : तिहार जेलमधील दहशतवादी तहसीन अख्तरकडून मोबाईल हस्तगत

Related Posts