IMPIMP

Afghanistan Crisis | अफगाणिस्तान सोडण्याची घाई पडली महागात, उडणार्‍या विमानातून पडले तीन लोक, टायर पकडून लटकले होते (व्हिडीओ)

by nagesh
Afghanistan Crisis | three afghan people fell from plane in kabul who holds the tyre of flight

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Afghanistan Crisis | अफगाणिस्तानात (Afghanistan Crisis) तालिबान (Taliban) च्या दहशतीमुळे देश सोडण्याची घाई तीन लोकांच्या जीवावर बेतली. काबुल एयरपोर्ट (Kabul airport) वरून उड्डाण घेणार्‍या एका विमानात जेव्हा जागा मिळाली नाही तेव्हा तीन लोक टायरला पकडून बसले (Three people grabbed the tires of a plane). परंतु विमान हवेत झेपावताच तीनही लोक आकाशातून खाली पडले (Fell down). तिन लोकांचा पडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे (video viral on social media). मात्र, हा व्हिडिओ कधीचा आहे यास दुजोरा मिळालेला नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

काबुल एयरपोर्टवर सध्या प्रचंड गर्दी आणि गोंधळ असल्याने विमानतळ बंद करण्यात आला आहे. (Kabul airport is currently closed).
विमानतळावर मोठ्या संख्येने जमाव जमला आहे. लोकांना कोणत्याही फ्लाईटने अफगाणिस्तान सोडून जायचे आहे. काही व्हिडिओ असेही आहेत, ज्यामध्ये लोक धक्काबुक्की करत विमानात घुसताना दिसत आहेत.

 

 

या दरम्यान काबुलच्या विमानतळावर फायरिंग झाली आहे आणि काही लोकांचा मृत्यू झाला आहे.
संपूर्ण अफगाणिस्तानचा एयरस्पेस बंद करण्यात आला आहे.
यामुळे अफगाणिस्तानमध्ये असलेल्या आणि परतण्याच्या तयारीत असलेल्या भारतीयांना मोठा धक्का बसला आहे.

 

सीमांवर तालिबान, विमानतळच एकमेव मार्ग

पाकिस्तान, इराण सारख्या देशांना लागून असलेल्या अफगाणिस्तानच्या सर्व सीमांवर तालिबानच्या दहशतवाद्यांनी कब्जा मिळवला आहे.
अशावेळी विमानतळच एकमेव बाहेर पडण्याचा मार्ग आहे, ज्याद्वारे लोक अफगाणिस्तानमधून बाहेर पडू शकतात.
परंतु ज्या प्रकारचे दृश्य काबुलमध्ये पहायला मिळत आहे.

ज्यामुळे लोकांमध्ये भिती आहे की अखेरचा पर्याय सुद्धा लवकरच बंद होऊ शकतो.
अशावेळी लोक कोणत्याही विमानात बसून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहेत.
सोशल मीडियावर असे असंख्य व्हिडिओ सर्क्युलेट होत आहेत, ज्यामध्ये लोक विमानांना लटकण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहेत.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

Web Title : Afghanistan Crisis | three afghan people fell from plane in kabul who holds the tyre of flight

 

हे देखील वाचा :

Sharad Pawar | शरद पवार यांनी दिला राज ठाकरेंना ‘हा’ सल्ला

आता LPG सिलेंडरची डिलिव्हरी मिळेल पसंतीच्या वेळी! परंतु द्यावा लागेल इतक्या रुपयांपर्यंत चार्ज, बुकिंगपूर्वी जाणून घ्या नियम

Pune Police | चोरीच्या गुन्ह्यातील जप्त केलेल्या वस्तूंचा पुणे पोलिसांकडून लिलाव

Pankaja Munde | पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर भडकल्या; म्हणाल्या – ‘कसल्या फालतू घोषणा देत आहात?’

Related Posts