IMPIMP

Bacchu Kadu-Lok Sabha Election 2024 | विश्वासात घ्या अन्यथा आम्ही आमचा निर्णय घेऊ; बच्चू कडूंचा भाजपला इशारा

by sachinsitapure
Bacchu Kadu | after two and a half years as a minister bachu kadus answer revealed his displeasure once again

अमरावती : Bacchu Kadu-Lok Sabha Election 2024 | महायुतीच्या जागा वाटपामध्ये (Mahayuti Seat Sharing) आम्हालाही विश्वासात घ्या अन्यथा आम्ही आमचा निर्णय घेऊ असा इशारा, प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी भाजप नेत्यांना दिला.

महायुतीमधील जागा वाटपाबाबत अद्याप कुठलाही निर्ण झालेला नाही. भाजप ३२ ते ३६ जागांवर लढण्याची तयारी करत आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या वाट्याला फारशा जागा येण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत छोट्या पक्षांच्या कुरबुरी सुरू आहेत. जागा वाटपाबाबत महायुतीमधील भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात एकमत होत नसताना महायुतीमधील छोट्या पक्षांनीही आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.

लोकसभेच्या जागावाटपाबाबत बच्चू कडू म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत आहोत. मात्र आता याबाबत भाजपाने पुढाकार घ्यावा. नाही घेतला तरी आमची काही हरकत नाही. आमची त्यांना विनंतीही नाही की यांनी पुढाकार घ्यावा. सोबत घ्यायचे की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. एक पाऊल त्यांनी समोर टाकावे आम्ही दहा पावले टाकू. बाजूने टाकले तर त्यांच्या बाजूने टाकू. विरोधात टाकले तर विरोधात टाकू.

वसंत मोरेंना राऊतांचा सल्ला, वॉशिंग मशिनच्या दिशेने जाऊ नये, प्रकाश आंबेडकरांना म्हणाले…

Related Posts