IMPIMP

Defective Number Plate Fine | अलर्ट ! कारच्या नंबरप्लेटवर लिंबू-मिर्ची, काळा दोरा लटकवला तर भरावा लागेल मोठा दंड, जाणून घ्या

by nagesh
Defective Number Plate Fine | if lemon pepper black rope hangs cars number plate 5000 challan will be torn New motor vehicle law

वृत्तसंस्था Defective Number Plate Fine | अनेक लोक कार, बाईक, टेम्पो अशा वाहनांवर लिंबू-मिर्ची, काळा दोरा वगैरे बांधत असतात. मात्र, याच लिंबू मिरची बांधल्यामुळे काही लोक याचा गैरफायदा घेत असतात. कारण काही लोक लिंबू-मिर्ची, आणि काळा दोरा थेट नंबर प्लेटवरच अडकवत असतात. वाहतूकीचे नियम तोडले तर कॅमेरामध्ये आपली नंबरप्लेट (Defective Number Plate Fine) दिसू नये असा त्यांचा उद्देश असतो. त्यामुळे ट्रॅफिक पोलिसांना अडथळा निर्माण होतो. या पार्श्वभुमीवर आता पोलिसांनी नवी मोहिम आखली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

या प्रकाराबाबात दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) ही मोहिम हाती घेतली आहे. मात्र, सध्या हा नियम महाराष्ट्रात लागू नाही. नंबरप्लेटवर लिंबू-मिर्ची, काळा दोरा वगैरे बांधल्याने एकजरी नंबर लपला किंवा अक्षर लपले तरी वाहतूक पोलिसांना ऑनलाईन चलन काढता येत नाही. जरी अंदाजाने काढले तरी ते दुसऱ्याच वाहन मालकाला जाण्याची शक्यता असते. अशा सर्व अडचणी पोलिसांसमोर उभ्या राहत आहेत. विशेष म्हणजे अशा कारनाम्यामुळे गैरफायदाही काही लोक घेत असतात. यामुळे नव्या वाहतूक नियमांनुसार डिफेक्टिव्ह नंबर प्लेट (Defective Number Plate Fine)असेल तर तब्बल 5 हजार रुपयांचा दंड (A fine of Rs 5,000) आकारण्यात येणार आहे. हा नियम आता दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) आखला आहे.

दरम्यान, नवीन मोटर वाहन कायद्यानुसार (New motor vehicle law) डिफेक्टिव्ह नंबर प्लेट असेल तर 5 हजार रुपयांचा दंड आहे.

तसेच हाय सिक्युरिटी नंबरप्लेट नसेल तरीदेखील 5 हजार रुपयांची पावती फाडली जाते.
तर, दिल्लीत तर पोलिसांनी लोकांनाचा अशा गाड्या दिसल्या की त्यांचे फोटो काढा आणि पोलिसांच्या सोशल
मीडियावर पोस्ट करा, असे आवाहन केले आहे.
अशाप्रकारे नंबर प्लेट लपवून या गाड्यांचा वापर गुन्ह्यांसाठी देखील केला जाण्याची शक्यता आहे.

तर, महाराष्ट्र राज्यात अशा प्रकारचा नियम लागू नसला तरीही नंबर प्लेट लपविण्याचे प्रकारही होतात.

काही जण मुद्दाम करतात किंवा काही अजाणतेपणी.
जर तुम्हीदेखील असे केले असेल तर वाहतूक पोलीस तुम्हाला रस्त्यात थांबवून जुन्या दंडाची पावती आकारू शकतात.
तसेच, विशेष म्हणजे, आता लिंबू-मिर्ची, काळा दोरा यामुळे जर तुमची कार, बाईक थांबविली आणि अन्य कागदपत्रे जरी तपासली त्यामध्ये काही चूक आढळली किंवा नसतील तर त्याचाही दंड तुम्हाला बसण्याची शक्यता आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

Web Title : Defective Number Plate Fine | if lemon pepper black rope hangs cars number plate 5000 challan will be torn New motor vehicle law

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्याच्या कोंढव्यात 10 % व्याज आणि मित्राकडून होणाऱ्या त्रासाला वैतागून युवकाची आत्महत्या, ‘दोस्त’ आला गोत्यात

Pune Crime | पुण्यात पैशाच्या वादातून गर्लफ्रेंडवर चॉपरने सपासप वार

Shripad Chhindam Arrest | शिवरायांचा अवमान करणार्‍या श्रीपाद छिंदमला भावासह अटक, जाणून घ्या प्रकरण

 

Related Posts