IMPIMP

Indian Railway | रेल्वे प्रवाशांसाठी चांगली बातमी ! आता तुमच्या कन्फर्म तिकिटावर दुसरा प्रवाशी सुद्धा करू शकतो प्रवास, जाणून घ्या कसे

by nagesh
Indian Railways | from when senior citizen to get concession again in indian rail Railway Minister Ashwini Vaishnav

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय रेल्वे (Indian Railway) ने रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर दिली आहे. आता तुम्ही तुमचे कन्फर्म तिकिट दुसर्‍या प्रवाशाला ट्रान्सफर (Transfer Confirm Ticket) करू शकता. यासाठी रेल्वेने काही नियमात बदल केला आहे. यापूर्वी अशा तिकिटाचे हस्तांतरण दंडणीय गुन्हा (Punishable Offence) मानला (Indian Railway) जात होता.

 

स्टेशन मास्तरांना द्यावा लागेल अर्ज

रेल्वे प्रवाशांना तिकिट कॅन्सल केल्याने अनेकदा आर्थिक नुकसान सुद्धा होते. रेल्वेने याच नियमात बदल केला आहे. इंडियन रेल्वेने आरक्षित तिकिटावर
एक विशेष सुविधा दिली आहे. यामध्ये ज्यांना कन्फर्म तिकिटावर प्रवास करायचा नाही ते आपल्या कुटुंबातील एखाद्याच्या नावावर तिकिट ट्रान्सफर करू शकतात. यासाठी एक अ‍ॅप्लीकेशन स्टेशन मास्टर (Station Master) यांना द्यावा लागेल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

कुणा-कुणाच्या नावावर करू शकता ट्रान्सफर

रेल्वे प्रवाशी आपले कन्फर्म तिकिट केवळ आपले आई-वडिल, भाऊ-बहिण, मुलगा-मुलगी आणि पत्नीच्या नावार ट्रान्सफर करू शकतात. एखाद्या लग्नासाठी किंवा पार्टीला जाणार्‍या लोकांसमोर अशी स्थिती आल्यास आयोजकाला 48 तास अगोदर आवश्यक कागदपत्र जमा करावे लागतात. व्यक्तिगत प्रकारे तिकिट ट्रान्सफर प्रक्रियेसह ऑनलाइन सुद्धा ही प्रक्रिया करता येते.

 

Web Title : indian railway now passengers can transfer their confirmed ticket to another passenger know how

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 168 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Anil Deshmukh | अनिल देशमुखांना 100 कोटी वसुली प्रकरणात क्लिनचिट?, CBI नं दिलं स्पष्टीकरण

 

Related Posts