IMPIMP

Indian Railways, IRCTC | डुप्लीकेट तिकिटाची मागणी केव्हा करता येते? जाणून घ्या पद्धत

by nagesh
Indian Railways | indian railways rule railway ban carry flammable goods and smoking and during travel irtct news in marathi

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Indian Railways, IRCTC | कोरोना महामारीदरम्यान भारतीय रेल्वेद्वारे अनेक ट्रेनचे संचालन केले जात आहे. मात्र, रेल्वे अजूनही पूर्ण क्षमतेसह ट्रेनचे संचालन करू शकलेली नाही. अनेक मार्गावर ट्रेनची संख्या वाढवली (Indian Railways, IRCTC) आहे.

अनेकदा प्रवाशी घाईगडबडीत आपले तिकिट सोबत आणण्यास विसरतात किंवा हरवतात. अशावेळी त्यांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो. ट्रेन प्रवासापूर्वी एखाद्या कारणामुळे डुप्लीकेट तिकिटा (duplicate ticket) ची आवश्यकता भासते. अशावेळी प्रवाशांना समजत नाही की ते कुठून मिळवावे (How to get a duplicate train ticket)?

रेल्वेच्या नियमानुसार, जर एखाद्या, हरवलेल्या, फाटलेल्या, खराब झालेल्या तिकिटाची स्थिती आरक्षित किंवा आरएसी असेल तर आरक्षण चार्ट तयार होण्यापूर्वी डुप्लीकेट तिकिटाची मागणी करता येऊ शकते. यासाठी स्टेशन मास्तरसाठी शुल्क भरून मुळ तिकिटाच्या बदल्यात एक डुप्लीकेट तिकिट जारी केले जाऊ शकते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

जर रिझर्व्हेशन चार्ट तयार झाल्यानंतर डुप्लीकेट तिकिटाची मागणी केली तर एकुण प्रवासभाड्याच्या
50% इतकी रक्कम भरल्यास डुप्लीकेट तिकीट जारी केजे जाऊ शकते. रिझर्व्हेशन चार्ट तयार
झाल्यानंतर आरएसी तिकिटाच्या बदल्यात डुप्लीकेट तिकिट जारी केले जाऊ शकत नाही.

डुप्लीकेट तिकिटासाठी प्रवाशांकडे त्यांचे ओळखपत्र मागितले जाऊ शकते. रिझर्व्हेशन
काऊंटरवरून घेतलेले तिकिट डिजिटल फॉर्ममध्ये दाखवणे मान्य नसते. डुप्लीकेट तिकिट
मिळवण्यासाठी प्रवाशांनी पीएनआर नंबर सुद्धा लक्षात ठेवला पाहिजे. यामुळे सहजपणे डुप्लीकेट
तिकीट मिळू शकते.

 

Web Title : indian railways irctc when train passengers can get duplicate ticket

 

हे देखील वाचा :

Auto Debit Payment System | 1 ऑक्टोबरपासून ऑटो डेबिट पेमेंट सिस्टम होत आहे लागू, बँक अकाऊंटमध्ये मोबाइल नंबर करून घ्या अपडेट; जाणून घ्या ADPS बाबत

Indian Railway | रेल्वे प्रवाशांसाठी चांगली बातमी ! आता तुमच्या कन्फर्म तिकिटावर दुसरा प्रवाशी सुद्धा करू शकतो प्रवास, जाणून घ्या कसे

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 168 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts