IMPIMP

ट्रेनमध्ये प्रवास करताना काही त्रास झाला तर Rail Madad App द्वारे ताबडतोब करा तक्रार; जाणून घ्या

by nagesh
Madad App | any problem while traveling in the train complaint instantly through rail madad app

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Rail Madad App | भारतीय रेल्वे प्रवाशांचा प्रवासाचा अनुभव चांगला बनवण्यासाठी रेल्वेने आता एक नवीन अ‍ॅप सुरू केले आहे. प्रवासात काही समस्या आली तर प्रवाशांना ‘रेल मदत अ‍ॅप’ (Rail Madad App) द्वारे तक्रार करता येईल. प्रवाशांच्या समस्या आणि तक्रारी सोडवण्यासाठी रेल्वेने हे अ‍ॅप बनवले आहे. कारण प्रवाशांना समजत नाही की प्रवासादरम्यान निर्माण झालेली समस्या कुठे मांडावी.

 

इंटरनेटच्या जमान्यात आता रेल्वेपर्यंत आपली तक्रार पोहचवणे अतिशय सोपे आहे. प्रवासी ‘रेल्वे मदत अ‍ॅप’ वर जाऊन आपला तिकिट नंबर टाकून तक्रार करू शकतात. प्रवासादरम्यान प्रवाशी पाणी, वीज आणि स्वच्छतेबाबत तक्रार दाखल करू शकतात.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

तसेच तुम्ही कोणत्याही प्रकारची तक्रार याद्वारे करू शकता. जर तुम्हाला रेल्वेच्या एखाद्या कर्मचार्‍याच्या वर्तणुकीबाबत किंवा कामाबाबत तक्रार करायची असेल तरीसुद्धा तुम्ही Rail Madad App ची मदत घेऊ शकता.

 

तक्रार करण्यासाठी तुम्हाला एक ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल ज्यामध्ये तक्रारीसंबंधी डिटेल, घटनेची तारीख, कर्मचार्‍याचे नाव, घटनास्थळ इत्यादीबाबत माहिती द्यावी लागेल.

 

फॉर्ममध्ये पर्सनल डिटेल्स, जसे की नाव, मोबाइल नंबर, ई-मेल, पत्ता इत्यादी माहिती देणे आवश्यक आहे.
तुम्ही यामध्ये तक्रार सविस्तर प्रकारे लिहू शकता. सोबतच आवश्यक डॉक्युमेंटसुद्धा अटॅच करावे लागतील.

 

Web Title : Madad App | any problem while traveling in the train complaint instantly through rail madad app

 

हे देखील वाचा :

IRCTC नं गुंतवणुकदारांना 2 वर्षात केलं ‘मालामाल’, एक लाखाचे दिले 10 लाख रुपये; जाणून घ्या ‘कमाई’चा मार्ग

Pune Crime | ‘बाळूमामा’ यांचा अवतार असल्याचा बनाव करून लाखोंची फसवणूक ! मनोहर मामा भोसले यांच्यासह तिघांवर अघोरी प्रथा व जादूटोणा व उच्चाटन कायदा आणि इतर कलमानुसार पहिला गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

WhatsApp वापरकर्त्यांना झटका ! फेसबुक पाहतंय तुमचे खासगी मेसेज? रिपोर्टमधून दावा

 

Related Posts