IMPIMP

Modi Government | मोदी सरकारच्या ‘या’ स्कीममध्ये 30 रुपयांपेक्षा सुद्धा कमीमध्ये मिळेल 4 लाखाचा मोठा फायदा, तुम्ही सुद्धा घेऊ शकता लाभ

by nagesh
7th Pay Commission DA Arear | 7th pay commission da arear news government employees dearness allowance 18 months da arear rupees 2 lakh come in salary pm narendra modi government

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  Modi Government | मोदी सरकार (Modi government) कडून देशातील कमजोर वर्गापर्यंत लाईफ इन्श्युरन्स पोहचवण्यासाठी 2 महत्वाच्या योजना चालवल्या जातात. पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana-PMSBY) आणि पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) या त्या योजना आहेत.

या योजनांमध्ये खुप कमी किंमतीत 2-2 लाख रुपयांपर्यंतचा लाईफ इन्श्युरन्स घेऊ शकता.
योजनांतर्गत केवळ 342 रुपये वार्षिक म्हणजे महिन्याच्या हिशेबाने दर महिना 30 रुपयांपेक्षा सुद्धा कमी खर्चात 4 लाख रुपयापर्यंतचा इन्श्युरन्स मिळवू शकता.
या दोन्ही योजनांबाबत जाणून घेवूयात…

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (PMSBY)

PMSBY चा वार्षिक प्रीमियम अवघा 12 रुपये आहे म्हणजे दर महिना केवळ 1 रुपयांचा खर्च आहे.
दरवर्षी 31 मेपूर्वी तुमच्या बँक खात्यातून प्रीमियमची रक्कम ऑटो डिडक्ट होईल आणि 1 जून ते 31 मेच्या कालावधीसाठी कव्हर मिळेल.
या स्कीममध्ये जर इन्श्युअर्ड व्यक्तीचा अ‍ॅक्सीडेंटमध्ये मृत्यू झाला पूर्णपणे अपंगत्व आले तर त्यास 2 लाख रुपयांचा अ‍ॅक्सीडेंट विमा मिळतो.

कायमस्वरूपी आंशिक अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांचे कव्हर मिळते.
यामध्ये 18 वर्ष ते 70 वर्ष वयाचा कुणीही व्यक्ती लाभ घेऊ शकतो.
70 वर्षाचे वय ओलांडल्यावर कव्हर संपुष्टात येईल.
योजनेसाठी बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
31 मे दरम्यान प्रीमियम कापण्यासाठी खात्यात बॅलन्स असणे आवश्यक आहे.
बँक खाते बंद झाले तर पॉलिसी कॅन्सल होईल.

 

प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना (PMJJBY)

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana सर्व भारतीयांसाठी आहे.
यामध्ये 18 ते 50 वर्षापर्यंतच्या प्रौढांना सहभागी होता येते. यामध्ये रजिस्टेशनसाठी बँक आणि Life insurance कंपन्यांमध्ये टायअप असते.

यामध्ये अवघे 330 रुपये वार्षीक प्रीमियम देऊन एनरोल होता येते.
2 लाख रुपयांचे इन्श्युरन्स कव्हर मिळेल. याचा कालावधी वर्षभर असतो.
दरवर्षी रिन्युअल करावे लागते.
Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana मध्ये Life cover 55 वर्षाच्या वयापर्यंत मिळते. कुणीही ग्राहक केवळ एक बँक अकाऊंट आणि एका इन्श्युरन्स कंपनीसोबतच या स्कीममध्ये सहभागी होऊ शकतो.

येथून घेऊ शकता योजनेचा लाभ

कोणत्याही जवळच्या बँकेत जाऊन अर्ज करू शकता.
बँक मित्राची मदतही घेऊ शकता.
इन्श्युरन्स एजंटशी सुद्धा संपर्क करू शकता.
सरकारी आणि प्रायव्हेट विमा कंपनी एकत्रितपणे ही सेवा देतात.

 

Web Title : Modi Government | get 4 lakh benefits pmsby and pmjjby scheme check how details here

 

हे देखील वाचा :

Sunanda Pushkar Death Case | सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात काँग्रेस नेते शशी थरुर यांची निर्दोष मुक्तता

Rain in Maharashtra | उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात ऑरेंज तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात यलो अलर्ट

LPG Gas Cylinder Price | घरगुती सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ; 25 रुपये द्यावे लागणार जादा

 

Related Posts