IMPIMP

PM Kisan | चुकीच्या पद्धतीने हप्ता घेणार्‍यांवर सरकारची कारवाई, राज्यांनी सुरू केली वसूली प्रक्रिया

by nagesh
PM Kisan | changes in the rules regarding the status of pm kisan scheme now mobile number will not be needed

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM Kisan | प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi scheme) 9वा हप्ता सरकारने शेतकर्‍यांच्या खात्यात ट्रान्सफर (DBT) केला आहे. मात्र अनेक अपात्र शेतकर्‍यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतल्याचे उघडकीस आले आहे. सरकारने या अपात्र शेतकर्‍यांवर कारवाई सुरू केली आहे. अनेक राज्य सरकारांनी चुकीच्या पद्धतीने योजनेचा फायदा घेणार्‍यांना रिकव्हरी नोटीस (Recovery Notice) जारी करून वसूली सुरू केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

केंद्र सरकारला लावला 2,900 कोटी रुपयांना चूना

अपात्र शेतकर्‍यांमध्ये सर्वात जास्त बनावट आधार कार्डवाले लाभार्थी आहेत. यांची संख्या 3.86 लाख आहे. यानंतर 2.34 लाखापेक्षा जास्त शेतकरी टॅक्सपेयर्स असल्याने पीएम किसान योजनेसाठी अपात्र ठरवले आहेत. यामध्ये 32 हजारपेक्षा जास्त मृत शेतकर्‍यांच्या खात्यात रक्कम पाठवली गेली आहे. सरकारने देशभरात 42 लाखापेक्षा जास्त अपात्र शेतकर्‍यांची ओळख पटवली आहे. त्यांच्या खात्यात आतापर्यंत 2,900 कोटी रुपये पाठवले आहेत.

 

 शेतकर्‍यांना कुठे जमा करावी लागेल रक्कम

अपात्र शेतकर्‍यांना उप-कृषी संचालक कार्यालयात रोख रक्कम जमा (Cash Deposit) करावी लागेल. रक्कम जमा केल्याची रिसिट मिळेल. नंतर विभाग शासनाच्या खात्यात ही रक्कम जमा करून ऑनलाइन पोर्टलवर फिडिंग करण्यासह अपात्र शेतकर्‍यांचा डाटा हटवण्यात येईल.

 

कोणत्या शेतकर्‍यांकडून पैसे परत घेतले जातील

1. कुटुंबातील कुणीही सदस्य टॅक्स भरत असेल.

2. जमीन कृषी योग्य नसेल. व्यावसायिक वापर असेल.

3. जमीन आजोबा, वडील किंवा इतरांच्या नावावर असेल.

4. दुसर्‍याची शेती करत असाल.

5. सरकारी नोकरी करणारे

6. विद्यमान किंवाम माजी खासदार, आमदार, मंत्री.

7. प्रोफेशनल रजिस्टर्ड डॉक्टर, इंजिनियर, वकील, चार्टर्ड अकाउन्टंट

8. महिन्याला 10,000 रुपये पेन्शन असेल.

9. इन्कम टॅक्स जमा केला असेल.

10. नगर परिषद विद्यमान किंवा माजी अध्यक्ष, जिल्हा, पंचायत समिती माजी किंवा विद्यमान अध्यक्ष.

11. केंद्र सरकार/ राज्य सरकार आणि PSUs चे विद्यमान किंवा सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी (मल्टी टास्किंग स्टाफ / चतुर्थ श्रेणी आणि ग्रुप डी कर्मचारी सोडून).

 

असे जाणून घ्या हप्त्याचे स्टेटस

1. सर्वप्रथमच अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.

2. होमपेजवर Farmers Corner चा ऑपशन दिसेल.

3. Farmers Corner सेक्शनमध्ये Beneficiaries List ऑपशनवर क्लिक करा.

4. नंतर ड्रॉप डाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.

5. यानंतर Get Report वर क्लिक करा. नंतर लाभार्थ्यांची पूर्ण लिस्ट समोर येईल, ज्यामध्ये तुमचे नाव शोधा.

 

Web Title :  pm kisan latest news farmers who took installments with wrong means state governments started recovery

 

हे देखील वाचा :

Police Inspector Transfer | पुणे ग्रामीण, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरमधील 14 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 151 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Kirit Somaiya | दापोलीतील मुरूडच्या समुद्रकिनारी अनधिकृत बंगले? शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर अन् अनिल परब अडचणीत

 

Related Posts