IMPIMP

Salary Slip | नोकरीमध्ये सॅलरी स्लिपचे काय आहे महत्व, जाणून घ्या कामाच्या 10 महत्वाच्या गोष्टी

by nagesh
Business Idea | business idea start laptop mobile repair business earn god income know how to start

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Salary Slip | बदलल्या काळात नोकरीतील सॅलरी स्लिपचे (Salary Slip) महत्व वाढले आहे. सॅलरी स्लिप म्हणजे वेतन पावती एक महत्वाचे कागदपत्र आहे. जॉब बदलताना नवीन एचआर विभाग (HR Department) याच्यावर जास्त जोर देतो. एका कर्मचार्‍यासाठी हा उत्पन्नाचा कायदेशीर पुरावा आहे. यामध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख असतो. याचे कोण-कोणते महत्व आहे ते जाणून घेवूयात…

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

(1) बेसिक सॅलरी

सॅलरी स्लिपमध्ये बेसिक सॅलरीचा उल्लेख असतो. PF आणि HRA ची गणना याच्याच आधारावर होते. बेसिक सॅलरीवरच टॅक्स द्यावा लागतो.

(2) हाऊस रेंट अलाऊन्स (HRA)

एचआरए बेसिक सॅलरीच्या 50% पर्यंत असू शकतो. तुम्ही भाड्याने राहताना वर्षात जेवढे भाडे देता, त्यातून बेसिक सॅलरीच्या 10% भाग कमी केल्यानंतर जे पैसे वाचतात, तो सुद्धा HRA होऊ शकतो. यावर टॅक्स सुद्धा अवलंबून असतो.

(3) LTA (लीव्ह ट्रॅव्हल भत्ता)

एलटीए कर-मुक्त असतो. वर्षात कमीत कमी एकवेळा हॉलिडे ट्रिप घेऊन कर सवलतीचा दावा करू शकता.

(4) प्रोफेशनल टॅक्स (PT)

तुमच्या सॅलरीच्या आधारावर हा टॅक्स असतो. वेगवेगळ्या राज्यात हा वेगळा आहे. तुम्ही या करावर दावा करू शकता.

(5) बोनस किंवा टार्गेट व्हेरिएबल पे (TVP)

कर्मचार्‍याची कामगिरी किती चांगली आहे, यावर टार्गेट व्हेरिएबल पे (टीव्हीपी) दिला जातो. हा पूर्णपणे करपात्र आहे.

(6) कन्व्हिनियन्स अलाऊंस किंवा ट्रॅव्हल अलाऊंस (वाहन भत्ता/प्रवास भत्ता)

कन्व्हिनियन्स कंपनी तुम्हाला तेव्हा देते जेव्हा तुम्ही कंपनीच्या कामासाठी बाहेर प्रवास करता. हे पैसे इनहँड सॅलरीत जमा करून मिळतात. 1,600 रुपयापर्यंत कन्व्हिनियन्स अलाऊन्सवर टॅक्स द्यावा लागत नाही.

(7) मेडिकल अलाऊन्स

हा अलाऊन्स मेडिकल कव्हर म्हणून दिला जातो. गरज भासल्यास याचा उपयोग केला जातो. 21,000 रुपयांपर्यंत ESIC साठी काही पैसे कापले तर ते कर्मचार्‍याच्या आरोग्य गरजांसाठी कापले जातात.

(8) स्पेशल अलाऊन्स

हे एक प्रकारचे रिव्हॉर्ड आहे, जे कर्मचार्‍यांना प्रोत्साहित करण्यासाठी दिले जाते. प्रत्येक कंपनीची परफॉर्मन्स पॉलिसी वेगळी असते. हा पूर्णपणे टॅक्सेबल आहे.

(9) प्रॉव्हिडंट फंड (PF)

कंपनीत 20 पेक्षा जास्त कर्मचारी असतील तर कंपनीला EPF कायदा -1952 अंतर्गत सेवानिवृत्ती लाभाचे पालन करणे आवश्यक आहे. पीएफ सॅलरीच्या 12% असतो. जो पीएफ अकाऊंटमध्ये जमा होतो.

 

Web Title : salary slip what is the importance of salary slip in a job know 10 important things related to it

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

हे देखील वाचा :

Sharad Pawar | नारायण राणे प्रकरणावर शरद पवारांनी दिली मोजक्या शब्दात प्रतिक्रिया; म्हणाले…

Pune Crime | BMC मध्ये गर्व्हमेंट सप्लायर्सची ऑर्डर देण्याच्या बहाण्याने 22 लाखाची फसवणूक, परदेशातील व्यापाऱ्यासह तिघांवर FIR

Earn Money | घरबसल्या कमवा 1 लाख रुपये महिना, केवळ करावे लागेल ‘हे’ काम; जाणून घ्या सोपी पद्धत

 

Related Posts