IMPIMP

SBI नं ग्राहकांना ‘त्या’ नंबर पासून केलं सावध, एका निष्काळजीपणामुळे बँक बॅलन्स होईल ‘झीरो’; जाणून घ्या

by nagesh
Digital Banking Fraud Alert | sbi alert for digital banking fraud online cyber crime helpline number

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI | सायबर गुन्हेगार बँक ग्राहकांना फसवण्यासाठी विविध प्रकार अवलंबत आहेत. त्यांच्यापासून सुरक्षित राहण्यासाठी बँकसुद्धा वेळोवेळी आपल्या ग्राहकांना सावध करत असते. याच पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India- SBI) ने बनावट कस्टमर केयर नंबर (Fraudulent Customer Care Numbers) बाबत अलर्ट जारी केला आहे.

एसबीआयने ट्विट करून ही माहिती दिली आहे. एसबीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, बनावट कस्टमर केयर नंबरपासून सावध राहा. कृपया योग्य कस्टमर केयर नंबरसाठी एसबीआयची अधिकृत वेबसाइट पहा. गोपनीय बँकिंग माहिती कुणासोबतही शेयर करू नका.

असे रिकामे होते खाते
बनावट कस्टमर केयर नंबरवर कॉल केल्यास सायबर गुन्हेगार तुमच्याकडून बँक खात्याच्या डिटेल घेतात आणि नंतर बँक खात्यातील सर्व पैसे काढून घेतात.
फोनवर ते तुमच्याकडून तुमची वैयक्तिक माहिती जसे की, नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी,
खाते क्रमांक, डेबिट कार्ड नंबर, ओटीपी मागतात आणि नंतर खाते रिकामे करतात.
यासाठी जेव्हा कस्टमर केयर नंबर आठवत नसेल तेव्हा बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नंबर मिळवा.

फिशिंग लिंकपासून रहा सावध
यापूर्वी, बँकेने आपल्या ग्राहकांना डिजिटल फ्रॉड किंवा ऑनलाइन फिशिंगबाबत जागृत केले होते.
बँकेने म्हटले होते की, इनबॉक्समध्ये अशा लिंक मिळत आहेत का? या लिंकवर क्लिक करू नका.
अशा फिशिंग लिंकवर क्लिक केल्याने बँक खात्यातील मेहनतीची कमाई बरबाद होऊ शकते.

sbi alert beware of fraudulent customer care numbers

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

हे देखील वाचा 

Pune Crime | पुण्याच्या रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून कोटयावधीचं सोनं चोरणार्‍या 2 महिला अन् लहान मुलगा CCTV मध्ये कैद, पाहा व्हिडीओ

Punjab New CM | …म्हणून अंबिका सोनींनी नाकारली सोनिया गांधींकडून आलेली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची ‘ऑफर’

Pune Crime | पुण्याच्या लक्ष्मी रस्त्यावरील शॉपमध्ये नोकरी मागण्यासाठी गेली होती 27 वर्षीय महिला, बाळू शिळीमकर म्हणाला – ‘नवऱ्यासोबत जो प्रोग्राम करते तो माझ्यासोबत कर’

Related Posts