IMPIMP

SBI ग्राहकांचा प्रश्न – खात्यात किती रुपये ठेवण्याची आवश्यकता? जाणून घ्या याचे योग्य उत्तर

by nagesh
SBI Hikes MCLR | State Bank of India sbi hikes mclr from again second rate increase in a month

नवी दिल्ली : वृत्तसंस्था स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने मिनिमम बॅलन्स (minimum balance) बाबत नियमांबाबत बदल केले आहेत. यामुळे लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे की अखेर सध्या बँकेत (SBI) किती मिनिमम बॅलन्स ठेवणे आवश्यक आहे. अनेक लोकांनी सोशल मीडियाद्वारे यासंदर्भात असंख्य तक्रारी केल्या आहेत. बँक व्यवस्थापक 100 रूपये मिनिमम बॅलन्स ठेवण्यास सांगत आहेत असे काहीजण म्हणत आहेत तर काहींचे म्हणणे आहे की 3000 रुपये खात्यात ठेवणे आवश्यक आहे. याबाबत नक्की काय नियम आहे जाणून घेवूयात…

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

किती मिनिमम बॅलन्स आहे आवश्यक?

बँकेत मिनिमम बॅलन्सला तांत्रिक भाषेत अ‍ॅव्हरेज मंथली बॅलन्स किंवा AMB म्हणतात. बँकेने बचत खात्यात किमान सरासरी बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता 11 मार्च 2020 पासून माफ केली आहे. म्हणजे 11 मार्च 2020 च्यानंतर जर एखाद्या व्यक्तीच्या खात्यात 3000 रुपयांपेक्षा कमी पैसे असतील तर बँकेकडून कोणताही चार्ज लावला जाणार नाही. सोबतच आता ग्राहकांना झीरो रुपये बॅलन्ससह सुद्धा आपले खाते सुरू ठेवता येऊ शकते.

 

 

फीबाबत काय आहे नियम?

पहिल्या नियमानुसार मेट्रो शहरांमध्ये एसबीआय सेव्हिंग खात्यावर एएमबी 3,000 रुपये, अर्ध शहरी
क्षेत्रांमध्ये एएमबी 2,000 रुपये आणि ग्रामीण क्षेत्रात एसबीआय शाखेत सेव्हिंग अकाऊंटवर एएमबी
1,000 रुपये ठेवण्यात आले होते.

मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास 5-15 रुपये प्लस जीएसटी वसूल केला जात होता. मात्र, बँकेचे म्हणणे आहे
की, मिनिमम बॅलन्स आणि एसएमएस शुल्क ज्या तारखेपासून न लावण्याची बँकेने घोषणा केली आहे, त्या
तारखेच्या पूर्वी जर तुम्ही एखादे शुल्क देय असेल तर ते भरावे लागेल.

अशावेळी जर 11 मार्चच्या पूर्वी तुमच्या खात्यात कमी असतील तर तुम्हाला शुल्क भरावे लागेल, पण
यानंतर कोणतेही शुल्क देणे अनिवार्य नाही. कुणीही ग्राहक एका कस्टमर आयडीसह एसबीआयमध्ये वेगवेगळी खाती उघडू शकतो. मात्र, एकच कस्टमर आयडीवरून सर्व अकाऊंटला इंटरलिंक करावे लागेल.

 

Web Title : sbi state bank of india sbi know minimum balance rule and how much money should you keep in bank balance check here all details

 

हे देखील वाचा :

Coronavirus in India | ऑगस्टमध्ये सातत्याने वाढत आहेत कोरोनाच्या नवीन केस, कालच्या तुलनेत 4 % वाढीसह आली सुमारे 45 हजार प्रकरणे

Tokyo Olympics | बजरंगाची ‘कमाल’ ! किर्गिस्तानच्या अरनाजरवर केली ‘मात’

Pune Crime | काय सांगता ! होय, पुण्यात पिस्तुल नाचवत मयत गुंड ‘भावेश’च्या बिर्थडेचं ‘सेलिब्रेशन’

 

Related Posts