IMPIMP

Rain in Maharashtra | राज्यात आगामी 4 दिवसात कोकण, मराठवाड्यात मुसळधार ! मुंबई, ठाणे, पालघरला IMD चा इशारा

by nagesh
Weather Update | temperature rise in vidarbha rainfall possibilities in konkan imd report today

सरकारसत्ता ऑनलाइन – Rain in Maharashtra | विश्रांती घेतलेल्या पावसाने मागील काही दिवसापासुन राज्याला झोडपण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मध्यम पाऊस (Rain) बरसला आहे. मात्र, गेली दोन दिवस पावसाचं वातावरण नाहीसं झालं आहे. दरम्यान, आगामी 4 दिवसांत राज्यात (Rain in Maharashtra) मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडुन (Indian Meteorological Department) वर्तवण्यात आला आहे. पुढील 48 तासामध्ये उत्तर आणि मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात आगामी 4 ते 5 (In 4 to 5 days) दिवसांत बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासहीत जोरदार पाऊस बरसणार आहे. असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद होऊ शकणार आहे.
तसेच महाराष्ट्रात 7 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, जालना अशा राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना (Rain) मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तर अहमदनगर, बीड, परभणी, अकोला, अमरावती, यवतमाळ, नांदेड, बुलढाणा, हिंगोळीमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे.
त्याचबरोबर कोकण पट्ट्यात आगामी 4 ही दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय.
तसेच, सागरी किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील दिला गेला आहे.

 

 

या दरम्यान, हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) उद्यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी ऑरेंज अलर्ट (Orange alert) दिला आहे. तर सातारा, पुणे, रायगड, कोल्हापूर,
मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी,
हिंगोली, नांदेड, चंद्रपूर अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्याता वर्तविण्यात आली आहे.

 

Web Title  : Rain in Maharashtra | weather update imd predict heavy rainfall kokan and marathwada major rain mumbai thane palghar

 

हे देखील वाचा :

Pune Police | ‘मोक्का’तील फरार ‘तुफानसिंग’ला कर्नाटकातून अटक, विशेष शाखेच्या स्पेशल सेलची कारवाई

Junner News | खोट्या शिवभक्त ‘अक्षय बोऱ्हाडे’वर पत्नीने केले ‘हे’ गंभीर आरोप

Ahmednagar News | दुर्दैवी ! TV ची केबल जोडताना शॉक बसून तरुण गोळाफेकपटूचा मृत्यू

 

Related Posts