IMPIMP

Viral Video | कलयुग ! मुलगा पैशांसाठी भररस्त्यात आईला फरफटत होता, कुत्र्याने दाखवली इमानदारी, पहा Video

by nagesh
Viral Video | son dragging mother on road for money pet dog showed loyalty to owner video viral

तमिळनाडु : सरकारसत्ता ऑनलाइन – Viral Video | कुत्र्यांची स्वामीनिष्ठा आणि इमानदारीचे अनेक किस्से नेहमीच ऐकायला मिळतात. तमिळनाडु (Tamil Nadu) च्या नामक्कल शहरात काहीसे असेच दृश्य पहायला मिळाले. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ वायरल (Social Media Viral Video) होत आहे. एक मुलगा आपल्या वृद्ध आईला भररस्त्यात पैशांसाठी मारत होता, तर तिचा पाळीव कुत्रा तिला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

या व्यक्तीची आई नल्लम्मल (Son Beating Mother Viral Video) आपल्या पतीच्या निधनानंतर पोन्नेरिपट्टीमध्ये एकटीच राहात होती.
तिने अगोदरच आपली सर्व जमीन आपल्या मुलाच्या नावावर केली आहे.
ती जगण्यासाठी आता मोलमजूरी करते. नल्लम्मलचा मुलगा शनमुगम आता आईकडून, तिचे घर आणि कमाईसुद्धा हडपण्याचा प्रयत्न करत आहे.

 

 

रिपोर्टनुसार आई नल्लम्मलने तीन लाख रुपये घरातच जमा करून ठेवले आहेत.
शनमुगम आपल्या आईला रस्त्यावर फरफटत तिच्याकडून चावी हिसकावण्याचा प्रयत्न करत होता. नल्लम्मलचा पाळीव कुत्रा (Dog Loyalty Viral Video) आपल्या मालकिणीला वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न करत होता.
त्याने शनमुगमवर अनेकदा हल्ला सुद्धा केला परंतु शनमुगमची पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी कुत्र्याला तेथून पळवून लावले.
ज्यानंतर नल्लम्मल रस्त्यावर एकटीच असहाय आणि जखमी आवस्थेत पडलेली दिसत होती.

नंतर नल्लम्मलला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
मात्र, मारहाणीचा हा व्हिडिओ वायरल झाल्याने पोलिसांनी शनमुगमला आपल्या आईला मारहाण केल्याच्या गुन्ह्यात अटक केली.
तर फरार असलेल्या त्याच्या पत्नीचा शोध पोलीस घेत आहेत.
एकुणच या घटनेवरून समजते की पोटची मुलेसुद्धा जन्मदात्रीच्या जीवावर उठू शकतात,
पण कुत्र्यासारखा इमानदार प्राणी शेवटपर्यंत आपल्या असहाय मालकाला साथ देतो.

 

Web Title : Viral Video | son dragging mother on road for money pet dog showed loyalty to owner video viral

 

हे देखील वाचा :

COVID-19 3rd Wave | नीति आयोगाचा गंभीर इशारा, म्हणाले – ‘सप्टेंबरमध्ये दररोज आढळू शकतात कोरोनाचे 4-5 लाख नवे रूग्ण’ ! 2 लाख ICU बेड तयार ठेवण्यास सांगितलं

Bank Locker Rules Changed | जर वर्षातून एकवेळा बँक लॉकर उघडला नाही तर तुम्ही अडचणीत येऊ शकता, बँक उचलू शकते ‘हे’ पाऊल, जाणून घ्या

Pune Crime | पुण्याच्या पारगाव मेमाणे गावात पूर्ववैमनस्यातून गोळीबार, टोळक्यांचा गावात धुडगुस; माजवली दहशत

 

 

Related Posts