IMPIMP

Pimpri Cheating Fraud Case | पिंपरी : वैद्यकीय प्रवेशाच्या बहाण्याने फसवणूक, 20 लाखांचा गंडा

by sachinsitapure
Cheating Fraud Case

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन – Pimpri Cheating Fraud Case | एम.डी वैद्यकीय अभ्यासक्रमात मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश देतो (Lure Of Admission In Medical College), असे सांगून एका महिलेची 19 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरात घडला आहे. या प्रकरणी तिन जणांविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात (Chikhali Police Station) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी 2023 ते 3 एप्रिल 2024 या कालावधीत रुपीनगर, तळवडे (Rupinagar Talwade) व डि. वाय. पाटील कॉलेज (DY Patil College) समोर घडला आहे.

याबाबत एका महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विशाल पवार, भास्कर राव, कुलभुषण कांबळे यांच्यावर आयपीसी 420, 406 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एम.डी साठी प्रवेश घ्यायचा होता. आरोपींनी संगनमत करुन भास्कर राव हे कॉलेजच्या मॅनेजमेंटमध्ये काम करत असल्याचे सांगितले.

फिर्यादी यांना डि.वाय पाटील कॉलेज पिंपरी येथे मॅनेजमेंट कोट्यातुन अॅडमिशन करुन देतो असे खोटे सांगितले. अॅडमिशन करुन देण्यासाठी आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी 19 लाख 75 हजार रुपये घेतले. यानंतर फिर्यादी यांनी अॅडमिशन बाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत काम लवकर होईल, असे सांगितले. मात्र, प्रवेश न झाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने तिघांविरोधात चिखली पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Police Inspector Arrested In Robbery Case | व्यावसायिकाचे दोन कोटी लुटल्याच्या प्रकरणात पोलीस निरीक्षकाला अटक, पोलीस दलात प्रचंड खळबळ

Related Posts