IMPIMP

मुलीने लग्नास नकार दिला म्हणून TikTok स्टारने केली आत्महत्या

by bali123
tiktoker commits suicide after rejection of marriage proposal by his fan

पेशावर : वृत्तसंस्था आजकाल प्रेमात कोण काय करेल सांगता येत नाही. काही लोक तर लग्नास नकार दिला तरी आत्महत्येसारखा पाऊल उचलतात. अशीच एक घटना पाकिस्तानमध्ये घडली आहे. टिकटॉक TickTock  स्टार शहजाद अहमद याने एका मुलीला लग्नासाठी मागणी घातली. मात्र, तिने नकार दिल्यावर त्याने आत्महत्या केली आहे.

शहजाद हा टिकटॉक TickTock  वर प्रचंड लोकप्रिय होता. त्याचे टिकटॉक TickTock  वर १० लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स होते. या अगोदरसुद्धा शहजादने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, पण तेव्हा त्याला वाचवण्यात यश आले होते. शहजादचा भाऊ सज्जातने या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. शहजादचे एका मुलीवर प्रेम होते. मात्र, तिच्या वडिलांनी त्याच्या लग्नाचा प्रस्ताव धुडकावून लावला. त्यामुळे शहजादला मोठा धक्का बसला होता. त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याची माहिती सज्जातने दिली आहे.

शहजादच्या मित्राकडून सांगण्यात आले की, दोन वर्षांपूर्वी एका मुलीने चाहती असल्याचे सांगत शहजादसोबत संपर्क साधला होता. त्यानंतर त्यांच्यामध्ये मैत्री झाली होती. ती मुलगी अल्पवयीन आहे आणि तिचे वय १६ वर्षे आहे. शहजादने त्या मुलीला प्रेमाची मागणीदेखील घातली होती. मात्र, मुलीने नकार दिला आणि यापुढे संपर्क न साधण्याची विनंती केली होती. यानंतर शहजादने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्यावर वेळीच उपचार केल्यामुळे त्याचा जीव वाचला होता.

शहजाद हा टिकटॉकवर व्हिडिओ बनवण्यात अधिक वेळ घालवत असल्यामुळे मुलीच्या वडिलांनी त्याच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार दिला. शहजादने त्या मुलीला महागड्या भेट वस्तू दिल्या होत्या. त्यावेळी तिच्या पालकांनी कोणताही आक्षेप घेतला नाही. त्यामुळे त्यांचाही होकार असावा, अशी समजूत त्याची झाली असावी, असे शहजादच्या मित्राने सांगितले. शहजाद आणि त्याचा मित्र आमीर यांचे भागीदारीत ऑनलाइन स्टोर आहे. त्यामधून शहजादला चांगले उत्पन्न मिळत होते, अशी माहिती आमीरकडून देण्यात आली आहे.

डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या तपासावर हायकोर्टाचे ताशेरे; ‘आणखी किती काळ तुमचा तपास सुरू राहणार?’

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS चे ‘क्राइम सीन’ प्रात्याक्षिक

21 तारखेला परीक्षा न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार; गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारला इशारा

Related Posts