IMPIMP

Abdul Sattar | अब्दुल सत्तारांचा खळबळजनक दावा, म्हणाले-‘आमदार अमोल मिटकरी आमच्या संपर्कात’

by nagesh
Abdul Sattar On Thackeray Group | abdul sattar slams thackeray group over controversial statement

अकोला : सरकारसत्ता ऑनलाइन भाजप (BJP) आणि शिवसेना Shivsena (शिंदे गट) सरकारमधील अनेक नेते आणि शिंदे गटातील (Shinde
Group) काही बंडखोर आमदार (Rebel MLA) आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार
अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर आता राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी
त्यांना टोमणा लगावला आहे. यावेळी अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी खळबळजनक दावा देखील केला आहे.

 

मिटकरी आमच्या संपर्कात

अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणाले, मिटकरींना एकदा तपासावे लागेल, त्यांना एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे नेले आणि तपासले, की निश्चितपणे त्यांच्यात काय फॉल्ट आहे, ते कळेल. राष्ट्रवादीतील अनेक लोक आमच्याकडे येतात. खरतर अमोल मिटकरीच आमच्या संपर्कात आहेत, असा खळबळजनक दावा सत्तार यांनी केला. ते आज अकोला (Akola) दौऱ्यावर होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय म्हणाले मिटकरी ?

मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet Expansion) मंत्रीपद न मिळाल्याने शिंदे गटातील अनेक आमदार नाराज आहेत.
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील गडचिरोली दौऱ्यावर असताना शिंदे गटातील अनेक आमदार त्यांच्या संपर्कात होते.
एवढेच नाही तर मंत्रिमंडळ विस्तार होत नाही आणि आम्हाला मंत्रिपद मिळेल, असे वाटत नाही.
त्यामुळे आम्ही शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) सोडून येण्याच्या मन:स्थितीत आहोत, असे जवळपास 12 आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे मिटकरी यांनी म्हटले होते.

 

Web Title : –  Abdul Sattar | maharashtra minister abdul sattar slam ncp mla amol mitkari over his criticism ek diwas balirajasathi campaign

 

हे देखील वाचा :

Black Tea Health Benefits | ब्लॅक टी प्यायल्याने कमी होतो मृत्यूचा धोका! सिगारेट ओढणार्‍यांचे चहाशी विशेष ’कनेक्शन’

Nitin Gadkari On Chandani Chowk Pune | चांदणी चौकातील पूल 2 दिवसांत पाडणार, पुण्यातील वाहतूक समस्येवर उडत्या बसची योजना रामबाण उपाय – नितीन गडकरी (व्हिडिओ)

High Cholesterol ची शत्रू आहे ‘ही’ हिरवी डाळ, भिजवून खाल्ल्याने होतील जबरदस्त फायदे

Mustard Oil Price | मोहरीच्या तेलात झाली घसरण, लोकांना मिळाला मोठा दिलासा, जाणून घ्या नवीन दर

 

Related Posts