IMPIMP

Abhijeet Bichukale | ‘बाळासाहेब ठाकरे असते तर एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता’; अभिजित बिचुकलेंचं वक्तव्य

by nagesh
Abhijeet Bichukale | abhijeet bichukale on eknath shinde, if balasaheb thackeray than

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Abhijeet Bichukale | शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सध्याच्या नाराजी नाट्यावर आणि राजकीय घडामोडीवर बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अभिजीत बिचुकले हे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आळंदी (Alandi) येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

“यांची नाटकं सुरु आहेत. संपूर्ण जनतेला यांनी वेठीस धरलेलं आहे. कोणत्या माणसाला निवडून द्यायचं हे जनतेने आता शिकायला हवं. यासाठी लोकांना अभिजीत बिचुकले हा पर्याय आहे. मी सर्वसामान्य जनतेचा आवाज आहे. कर्म करा, असं ईश्वरानं सांगितलं. मी राष्ट्रपती, पंतप्रधान होण्यासाठी धडपड करत आहे. माऊली मला एक दिवस राष्ट्रपती किंवा पंतप्रधान बनवतील.” असं अभिजित बिचुकले (Abhijeet Bichukale) म्हणाले.

 

बाळासाहेब ठाकरेंना (Balasaheb Thackeray) सध्याची महाराष्ट्रातील परिस्थिती आवडली असती का?’ असा सवाल करताच यावर अभिजित बिचुकले यांनी उत्तर दिलं आहे की, “आज बाळासाहेब ठाकरे असते तर एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता.” त्यांच्या या वक्तव्याने सर्वत्र चर्चा रंगल्या आहेत.

 

दरम्यान, एकनाथ शिंदे आज संध्याकाळी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे.
एकनाथ शिंदे आपल्या 35 समर्थक आमदारांसोबत सूरतमध्ये असून ते आज केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (J.P Nadda) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे एकनाथ शिंदेसोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे.
ही बैठक अहमदाबादमध्ये होणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदेसह इतर आमदारांचं बंड सफल झाल्यास महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेना चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Abhijeet Bichukale | abhijeet bichukale on eknath shinde, if balasaheb thackeray than

 

हे देखील वाचा :

Akasa Air | राकेश झुनझुनवाला यांच्या कंपनीचे पहिले विमान आले, पुढील महिन्यापासून Akasa चे उड्डाण

Uddhav Thackeray Government | पक्षांतर बंदी कायदा ! ‘ठाकरे सरकार’ वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना एवढ्या आमदारांची गरज

Maharashtra Political Crisis | राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी ! एकनाथ शिंदे आणि समर्थक मंत्री संध्याकाळपर्यंत मंत्रिपदाचा राजीनामा देणार ?

 

Related Posts