IMPIMP

Aditya Thackeray | ‘स्वत:साठी खोके आणि महाराष्ट्रासाठी धोके’, पुण्यात येणारा मोठा प्रकल्प गुजरातला गेल्याने आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल (व्हिडिओ)

by nagesh
 Aditya Thackeray | aaditya thackeray after vedanta another project has gone aditya thackeray says govts industry

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) असताना राज्यात दोन कंपन्या गुंतवणूक (Investment) करणार होत्या. ‘वेदांता’ (Vedanta) आणि ‘फॉक्सकॉन’ (Foxconn) या दोन मोठ्या कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करणार होत्या. पण राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अचानक या दोन्ही कंपन्या गुजरातला (Gujarat) गेल्या. वेदांतसारखी कंपनी राज्यात तब्बल एक लाख तरुणांना रोजगार देणार होती. पण ही कंपनी गुजरातला गेली. यामुळे शिवसेना आमदार (Shivsena MLA) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर (Shinde Government) सडकून टीका केली. राज्यातील सरकार हे खोके सरकार आहे. जीत के हारने वालो को खोके सरकार कहतै है, अशी टीका आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

https://fb.watch/fwcvAQe833/

 

वेदांता प्रकल्प राज्यात येणार होता. पण तो प्रकल्प गुजरातला गेला. या प्रकल्पामुळे राज्यातील एक लाख तरुणांना रोजगार मिळू शकला असता. राज्यातील ही गुंतवणूक नेमकी का निघून गेली ते स्पष्ट करा. वेदांता कंपनीच्या अनिल अग्रवाल (Anil Aggarwal) यांच्याशी चर्चा केली होती. फॉक्सकॉन कंपनी महाराष्ट्राबाहेर गेली. महाराष्ट्रात येणारी कंपनी शेवटच्या मिनिटाला गुजरातला निघून गेली. ती का निघून गेली? असा सवाल आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला आहे.

 

 

पुणे जिल्ह्यातील तळेगाव (Talegaon) या ठिकाणी इंडस्ट्री येणार होती.
1.75 लाख कोटींची गुंतवणूक होती. ही कंपनी 75 हजार रोजगार निर्माण करणार होती.
मात्र कंपनी महाराष्ट्राबाहेर गेली तेव्हा खोके सरकार काय करत होते? एका महिन्यात असं काय घडलं की ही गुंतवणूक राज्याबाहेर कशी काय गेली? या राज्यात आम्ही साडेसहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणत होतो.
दावोसमध्ये आम्ही या संदर्भात अनेक बैठका घेतल्या होत्या.
महाराष्ट्रात ही कंपनी येणार होती तर मग दुसऱ्या राज्यात का आणि कशी गेली?
राज्यातील खरे मुख्यमंत्री कोण असतील त्यांनी खुलासा करावा, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मंत्रालयात बसून काम करणे गरजेचे आहे. स्वत:साठी खोके आणि महाराष्ट्रासाठी धोके. राज्य सरकारचा कुठे अंकुश दिसत नाही. एक लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार होते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Aditya Thackeray | aditya thackerays anger as the project coming to pune calls gujarat a khoke sarkar to shinde government

 

हे देखील वाचा :

Jayant Patil | ‘पुन्हा एकदा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला’, मोठा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर जयंत पाटील संतापले

Eggs And Cholesterol | अंडे हाय कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढवते का? जाणून घ्या कोणते फूड्स आजपासूनच डाएटमधून हटवले पाहिजेत

Pune Crime | पत्त्याच्या क्लबवर गुन्हे शाखेचा छापा, 12 जण ताब्यात

Pune Pimpri Crime | धक्कादायक ! बनावट कागदपत्राद्वारे शिपायाने दिले कंत्राटी ग्रामसेवक भरतीचे आदेश, दापोडी उपनिबंधक कार्यालयातील प्रकार

 

Related Posts