IMPIMP

Jayant Patil | ‘पुन्हा एकदा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला’, मोठा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर जयंत पाटील संतापले

by nagesh
Jayant Patil On Shinde-Fadnavis Govt | ncp leader jayant patil slams shinde fadnavis goverment maharashtra over Maharashtra Karnataka Border Issue

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  – तब्बल 1 लाख 58 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक (Investment) असलेला आणि सुमारे एक लाख रोजगार निर्माण (Job) करणारा उद्योग महाराष्ट्राच्या (Maharashtra) हातून निसटल्याने महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) घटक पक्ष शिंदे सरकारवर (Shinde Government) आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी याप्रकारावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. एक लाख नोकऱ्या देणारा उद्योग राज्याबाहेर गेला आहे. पुन्हा एकदा गुजरातने (Gujarat) महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला, असा आरोप जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. वेदांत ग्रुप (Vedanta Group) व फॉक्सकॉन कंपनीच्या (Foxconn Company) संयुक्त भागीदारीत सुमारे 20 बिलियन डॉलर्स म्हणजेच एक लाख 58 हजार कोटी इतकी भांडवली गुंतवणूक (Capital Investment) असलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला गेलेला आहे. सुमारे एक लाख इतकी रोजगारक्षमता असलेला प्रकल्प महाराष्ट्राने गमावला आहे.

 

 

महाविकास आघाडीने या गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा केला होता. या कंपनीच्या शिष्टमंडळाने नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (CM) व उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना राजकीय सभा घेण्यातून वेळ मिळत नसल्याने पुन्हा एकदा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गुजरातच्या निवडणूक (Gujarat Elections) तोंडावर आल्याने महाराष्ट्रातील भाजपा (BJP) गुजरातचे हित
जपण्यात व्यस्त दिसते. महाराष्ट्रातील तरुणांचा हक्काचा रोजगार गमावल्याबद्दल राज्यातील सुशिक्षित बेरोजगार
तरुणांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री माफी मागतील का? असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

 

 

Web Title :- Jayant Patil | an industry that provides one lakh jobs is out of the state once again gujarat has taken away the grass from the mouth of maharashtra jayant patils criticism

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पत्त्याच्या क्लबवर गुन्हे शाखेचा छापा, 12 जण ताब्यात

Pune Pimpri Crime | धक्कादायक ! बनावट कागदपत्राद्वारे शिपायाने दिले कंत्राटी ग्रामसेवक भरतीचे आदेश, दापोडी उपनिबंधक कार्यालयातील प्रकार

Eggs And Cholesterol | अंडे हाय कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढवते का? जाणून घ्या कोणते फूड्स आजपासूनच डाएटमधून हटवले पाहिजेत

Pune Ring Road – Land Acquisition | रिंगरोडच्या भूसंपादनाला सुरूवात

 

Related Posts