IMPIMP

SpiceJet च्या प्रवाशांनो, आता फक्त 299 रुपयांत करा कोरोना टेस्ट तेही घरबसल्या !

by bali123
airline company spicejet will test corona for just rs 299 for its passenger business

नवी दिल्ली : जर तुम्ही घरबसल्या कोरोना टेस्ट करू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण आता देशातील सर्वांत मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या स्पाइस जेट spicejet कडून तुम्हाला ही सुविधा दिली जाणार आहे. ही सुविधा तुम्हाला फक्त 299 रुपयांत मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही विमान प्रवासी असणे गरजेचे आहे.

देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यानंतर आता विमान कंपनी स्पाइस जेटने प्रवाशांसाठी स्वस्तात कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, स्पाइस जेटच्या प्रवाशाला फक्त 299 रुपयांत घरबसल्या कोरोना टेस्ट करता येणार आहे. फक्त स्पाइस जेटच्या प्रवाशांनाच ही सुविधा आहे असे नाही. ही सुविधा इतर विमान कंपन्यांच्या प्रवाशांसाठीही उपलब्ध असणार आहे. त्यासाठी तुम्हाला 299 रुपयांऐवजी 499 रुपये द्यायला लागणार आहेत. ही रक्कमही कमी आहे. कारण यापेक्षा स्वस्तात अद्याप कोणतीही विमान कंपनी कोरोना टेस्ट करत नाही. या योजनेसाठी स्पाइस जेट कंपनी विविध राज्य सरकारे आणि सरकारी मेडिकल संस्थांसोबत काम करत आहे.

दरम्यान, कंपनीच्या मोबाईल लॅब टेस्टिंग आणि कॅलिब्रेशन लॅबला इंडियन मेडिकल रिसर्च काउन्सिलची मान्यता आहे. स्पाइस जेटची मोबाईल लॅब पहिल्या टप्प्यात मुंबई आणि दिल्लीमध्ये सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करणार आहे. तुमच्या घरातून सॅम्पल कलेक्ट करणार आहे. तसेच www.spicehealth.com वरून अपॉइंटमेंट बुक करू शकता. याशिवाय स्पाइस हेल्थ मोबाईल लॅबवर जाऊन स्वत: टेस्ट करू शकता. PNR नंबर देऊन वेबसाइटवरून RT-PCR COVID-19 Test सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Gold Price Today : आत्तापर्यंत 11,691 रुपयांनी स्वस्त झालं सोने; जाणून घ्या दर…

पुण्यात लॉकाडाउन नाहीच ! उपाययोजनांची कडक अंमलबजावणी

Mukesh Ambani Bomb Scare : तिहार जेलमधील दहशतवादी तहसीन अख्तरकडून मोबाईल हस्तगत

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली

BSNL ग्राहकांनो सावधान ! एक SMS करू शकतो तुमचं अकाउंट ‘रिकामे’

Related Posts