IMPIMP

Ajay Devgan | बॉलिवूड चित्रपट अयशस्वी होण्याबद्दल अजय देवगणचे मोठे विधान; म्हणाला…

by nagesh
Ajay Devgan | ajay devgan opens up about audience choices of films rnv

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – Ajay Devgan | सध्या बॉलीवूडचा ‘दृश्यम 2’ हा चित्रपट चर्चेत आहे. त्याचबरोबर या चित्रपटातील कलाकारही त्यांच्या अभिनयामुळे चर्चेत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून बॉलीवूडला अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. एका मागून एक चित्रपट फ्लॉप होत असताना त्यातच बॉयकॉट बॉलीवूड हा ट्रेंड देखील सुरू आहे. या ट्रेंडचा फटका तर आत्तापर्यंत अनेक चित्रपटांना बसला आहे. या सगळ्या परिस्थितीवर अभिनेता अजय देवगण यांनी भाष्य केले आहे. (Ajay Devgan)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सध्या ‘दृश्यम 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करताना दिसत आहे. चार दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आता नवीन रेकॉर्ड बनवायला सुरुवात केली आहे. तर गेले अनेक दिवस अजय देवगण आणि या चित्रपटाची टीम चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. यादरम्यानच अजय देवगणनला एका मुलाखतीत प्रेक्षकांना मोठ्या संख्येने चित्रपटगृहात आणायचे असेल, तर काय करावे लागेल, असे विचारले असता, त्यांनी यावर त्यांचे मत मांडले.

 

 

यावेळी अजय देवगण म्हणाला, “बॉक्स ऑफिसवर चित्रपट चालण्यासाठी एका विशिष्ट टॉनिकची गरज असते.
सध्या दृश्यम या चित्रपटाच्या सिक्वेलसाठी प्रेक्षक प्रचंड आतुरतेने वाट पाहत होते.
2014 मध्ये दृश्यम चित्रपट प्रदर्शित झाला. त्याने देखील बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आणि आता ‘दृश्यम 2’ ची देखील यशस्वीरीत्या घोडदौड सुरू आहे.
बॉलीवूडला तीन-चार दृश्यम हवेत असेही ते म्हणाले. प्रेक्षकांना सलग अडीच तास गुंतवूण ठेवणे सोपे राहिलेले नाही आणि मनोरंजक चित्रपट करणे देखील त्याहून सोपे राहिले नाही.
आता प्रेक्षक हुशार झाले आहेत. मनोरंजनाच्या नावाखाली त्यांना काहीही दाखवून चालणार नाही.
व्यवसायिक चित्रपटाच्या मनोरंजनाविषयी बोलताना तुम्हाला प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन द्यावे लागते आणि प्रेक्षकांना तेच हवे असते”.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ajay Devgan | ajay devgan opens up about audience choices of films rnv

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | समाजसेवा करतो म्हणून कोयत्याने सपासप वार करुन पत्नीचा केला विनयभंग; वाकड परिसरातील घटना

MLA Bhaskar Jadhav | भास्कर जाधवांना पुणे न्यायालयाकडून दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर

 

Related Posts