IMPIMP

Ajit Pawar | साहित्य क्षेत्रात राजकारण्यांनी ढवळाढवळ करू नये; ‘फ्रॅक्चर्ड फ्रिडम’ पुस्तकावरून अजित पवारांची प्रतिक्रिया

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar reaction on shinde fadnavis governments on award announced of marathi translation of kobad gandhi original english book was cancelled

मुंबई :सरकारसत्ता ऑनलाईन – ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ हे पुस्तक (Fractured Freedom Book) सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. राज्य
शासनाकडून कोबाड गांधी (Kobad Gandhi) यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ पुस्तकाच्या मराठी अनुवादाला जाहीर झालेला ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
पुरस्कार’ (Tarkatirtha Lakshmanasastri Joshi Award) रद्द करण्यात आला. त्यामुळे सर्वच स्तरांतून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावर
राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारचा साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप
वाढत आहे, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

 

तसेच सरकारचा साहित्याच्या क्षेत्रात हस्तक्षेप करणे योग्य नाही. राजकीय क्षेत्राचा साहित्यात हस्तक्षेप वाढला आहे. ही गंभीर बाब आहे. 6 डिसेंबर 2022 रोजी उत्कृष्ट साहित्यासाठी पुरस्कार जाहीर केले. त्यातील मूळ इंग्रजी पुस्तकाचे अनुवादित कोबाड गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ पुस्तकासाठी पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर 6 दिवसांत अशा काही घटना घडल्या की, 12 तारखेला पुरस्कार रद्द केला गेला. हे योग्य नाही, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांनी राज्याच्या निर्मितीपासून साहित्य,
कला संस्कृतीला नेहमी सन्मान दिला. ती परंपरा सर्वांनी पुढे नेली पाहिजे.
उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी दिले जाणारे एकूण 33 पुरस्कार जाहीर करण्यात आले होते.
त्यात अनुवादित साहित्यासाठी अनघा लेले (Angha Lele) यांना पुरस्कार जाहीर केला होता.
मात्र, सहा दिवसांत अचानक सरकारने पुरस्कार समिती बरखास्त करून अनघा लेले यांचा पुरस्कार रद्द केला.

 

सरकारने यात हस्तक्षेप करणे निषेधार्ह आहे. शिंदे सरकार (Shinde Government) सत्तेत आल्यापासून सातत्याने नवे वाद काढण्यात व्यग्र आहे.
जाणीवपूर्वक इतर महत्वाचे प्रश्न दुर्लक्ष करण्यासाठी हे सर्व सुरू आहे. समितीने दिलेल्या पुरस्कात राजकीय हस्तक्षेप उघड उघड दिसत आहे.
त्यामुळे राज्यकर्त्यांनी राज्य करावे, साहित्याच्या क्षेत्रात ढवळाढवळ करू नये, असेही पवार म्हणाले.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar reaction on shinde fadnavis governments on award announced of marathi translation of kobad gandhi original english book was cancelled

 

हे देखील वाचा :

Birendra Saraf | ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ बिरेंद्र सराफ राज्याचे नवीन महाधिवक्ता

Pune PMC News | जाहिरात फलकांचे दर 222 रुपयांवरून 576 रुपये प्रति चौ. फूट होणार; महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचा स्थायी समितीसमोर प्रस्ताव

Pune PMC News | अग्निशमन सेवा शुल्क वाढीचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

BJP MLA Nitesh Rane | आमदार नितेश राणे यांचा सातारा पोलिसांना इशारा, म्हणाले- “माझ्यासमोर सिंघमगिरी करू नका, नाहीतर…”

 

Related Posts