IMPIMP

Ajit Pawar | …. अन् अजित पवारांनी कपाळावरच हात मारला; जाणून घ्या प्रकरण

by nagesh
Ajit Pawar | ajit pawars dismissal reaction after seeing mistake name of minister Hasan Mushrif in Pimpalner of parner ahmednagar district marathi news policenama

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Ajit Pawar | एखाद्या कार्यक्रमाला मंत्री येणार म्हंटल्यावर तेथे निटनिटकेपणा आणि टापटीपपणा असतोच. तेथील चुका काढण्याची किंवा बोलण्याची संधी मंत्रीमहोदयांना न देण्याचा प्रयत्न असतो. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हंटले तर ते किती दक्ष असतात हे वेळोवेळी सर्वानीच पाहिले आहे. पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर येथेही त्यांच्या दक्षतेची प्रचिती आली. विठ्ठल रुक्मिणी मंदिर, संत निळोबारायांच्या राहत्या वाड्याचा जिर्णोद्धार पवार यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी, जीर्णोद्धार वाड्याच्या कोनशिला वरील अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे नाव पाहून त्यांनी कपाळावरच हात मारला. इतकच नाही तर त्यांनी भन्नाट प्रतिक्रिया देखील दिली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पारनेर (Parner) तालुक्यातील पिंपळनेर (Pimpalner) येथे संत श्रेष्ठ निळोबाराय यांच्या अभंग गाथेच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन संपन्न सोहळा पार पडला.
यावेळी, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), गृह मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil),
जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले (Rajshree Ghule), आ. निलेश लंके (MLA Nilesh Lanke), चैतन्य महाराज देगलुरकर,
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (dr rajendra bhosale collector) उपस्थित होते.
दरम्यान, संत निळोबाराय यांचे निवासस्थान असलेला वाडा आणि मंदिर यांच्या जीर्णोद्धार कामाचे भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी त्यांचे लक्ष कोनशिलेवर गेले. त्यावर पालकमंत्री हसन मुश्रीफऐवजी (hasan mushrif) ‘मुस्त्रीफ’ अशी शब्दरचना करण्यात आली होती.
हे पाहून अजित पवारांनी (Ajit Pawar) कपाळावर हात मारला. तसेच भन्नाट रिएक्शन दिली.
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, पारनेर शहरातील नागरिकांसाठी मुळा धरणाच्या बॅक वॉटरमधून पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर केली असून या योजनेचे विद्युत देयक नियमितपणे भरावे, असे ते म्हणाले.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawars dismissal reaction after seeing mistake name of minister Hasan Mushrif in Pimpalner of parner ahmednagar district marathi news policenama

 

हे देखील वाचा :

खुशखबर ! Aadhaar मध्ये अ‍ॅड्रेस बदलणे झाले सोपे, देशभरात उघडणार 166 सेवा केंद्र; ‘या’ पध्दतीची असेल सुविधा, जाणून घ्या

Pune Corporation | कात्रज परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत करावा; नगरसेवक प्रकाश कदम यांची सर्वसाधारण सभेत मागणी

Amravati Violence | वादग्रस्त वक्तव्य करुन काड्या करु नये, संजय राऊतांनी साधला फडणवीसांवर ‘निशाणा’

 

Related Posts