IMPIMP

Ajit Pawar | ‘तू स्टँप पेपर आण, मी लिहून देतो’, ‘त्या’ प्रश्नावर अजित पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका (व्हिडिओ)

by nagesh
Ajit Pawar | ncp ajit pawar clears mahavikas aghadi united in elections

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) राष्ट्रवादी (NCP) हा मोठा भाऊ असल्याचे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Former CM Prithviraj Chavan) यांनी ठाकरे गट (Thackeray Group) तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असल्याचे सांगत ठाकरे गटाला डिवचले. हा विषय सुरु असतानाच महाविकास आघाडीत जागावाटपावरून वेगवेगळी विधानं नेत्यांकडून केली जात आहे. यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होईल का, याबाबत अजित पवारांनी (Ajit Pawar) भूमिका स्पष्ट केली.

आगामी लोकसभा (Lok Sabha), विधानसभा (Legislative Assembly) आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये (Local Body Election) महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र? यासंदर्भात संभ्रम असताना अजित पवारांनी (Ajit Pawar) स्पष्टपणे महाविकास आघाडी एकत्र राहणार असल्याची भूमिका मांडली आहे. यासंदर्भात पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, स्टँप आण, मी लिहून देतो, महाविकास आघाडी 100 टक्के एकत्र राहणार, असे सांगितले.

 

अजित पवार पुढे म्हणाले, अशा प्रकारच्या चर्चा चालतात. एका पक्षातही वेगवेगळे विचार समोर येतात. शेवटी अंतिम निर्णय त्या पक्षाचे सर्वोच्च नेते घेतील. त्याची अंमलबजावणी त्या पक्षाचे कार्यकर्ते करतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आम्हाला आमचं मत मांडण्याचा अधिकार असतो. मविआची एकी राहावी म्हणून वरिष्ठ पातळीवर होणारे निर्णय तिन्ही पक्षांना मान्य असतात. त्यामुळे वेगळा अर्थ काढू नका, असंही ते म्हणाले.

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

दरम्यान, मविआतील जागावाटप मेरिटनुसार होईल. सर्व बाजूंचा विचार करुन जागा वाटप होईल आणि
मेरिटवर निर्णय झाला तर अनावश्यक चर्चा थांबेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
(Congress State President Nana Patole) यांनी सोमवारी म्हटले होते.
प्रत्येक पक्षाने जागांची चाचपणी केली पाहिजे यात काही गैर नाही, असे सांगताना पटोले यांनी प्रदेश काँग्रेसने
संभाव्य जागांसाठी समित्या नेमल्याची माहिती दिली.

Web Title : Ajit Pawar | ncp ajit pawar clears mahavikas aghadi united in elections

Related Posts