IMPIMP

Anil Deshmukh | ‘या’ कारणामुळं गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला, ED च्या चार्जशीटमध्ये अनिल देशमुखांचा जबाब

by nagesh
Anil Deshmukh | anil deshmukh told ed that parambir singh is mastermind in antilia bomb scare and mansukh hiren case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – कथित 100 कोटींची वसूली प्रकरणात अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा (Resignation) द्यावा लागला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीला (ED) दिलेल्या जबाबात आपल्या राजीनामा देण्याबाबतचा खुलासा केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Former Mumbai CP Parambir Singh) यांनी केलेल्या आरोपाची चौकशी सीबीआयकडे (CBI) सोपवण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) दिले होते. त्यानंतर देशमुख (Anil Deshmukh) यांनी राजीनामा दिला. ईडीच्या आरोपपत्रातून राजीनाम्याचे कारण समोर आले आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी ईडीला सांगितले की, 20 मार्च 2021 रोजी परमबीर सिंह यांनी माझ्यावर आरोप करणारे एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. त्या पत्राच्या आधारे ॲड. जयश्री पाटील (Adv. Jayashree Patil) यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. त्यानंतर हायकोर्टाने 5 एप्रिल 2021 रोजी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले. त्यानंतर नैतिकतेच्या आधारे आपण राजीनामा दिल्याचे देशमुख यांनी सांगितले.

 

परमबीर सिंह यांनी खोटी माहिती दिली
रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख (Reliance Industries) मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या अँटिलिया (Antilia) या निवासस्थानाबाहेर आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्य सरकारची (State Government) दिशाभूल करत खोटी माहिती दिली असल्याचे अनिल देशमुख यांनी ईडीला सांगितले. त्यांनी सांगितले की, 5 मार्च 2021 रोजी विधिमंडळाचे अधिवेशन सुरु होते. त्यावेळी माहिती करुन घेण्यासाठी परमबीर सिंह यांना विधानसभेत बोलवण्यात आले होते. त्यावेळी मी गृहमंत्री होतो. सिंह यांना बोलावले त्यावेळी माझ्यासह अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव (Additional Chief Secretary Manukumar Srivastava) व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मनसुख हत्या आणि अँटिलिया प्रकरणी परमबीर सिंह देत असलेली माहिती दिशाभूल करणारी होती.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

परमबीर सिंह मास्टरमाईंड
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर या प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे (Anti-Terrorism Squad) देण्यात आला.
काही दिवसांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगल्यावर ब्रिफिंग करण्यात आली.
यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे (Chief Secretary Sitaram Kunte) आणि गृहविभागाचे इतर अधिकारी होते.
त्यावेळी परमबीर सिंह हे सरकारची दिशाभूल करत असल्याचे आढळून आले.
या ब्रिफिंग दरम्यान, पोलीस कार्यालयातील इनोव्हा कारचा वापर सचिन वाझेने (Sachin Vaze) केला होता.
यानंतर काही दिवसांत एनआयएने (NIA) तपास आपल्या हाती घेतला. 13 मार्च 2021 रोजी सचिन वाझेला अटक झाली.
परमबीर सिंह हे या प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचे मला नंतर समजले होते, असेही देशमुख यांनी सांगितले.

 

Web Title :- Anil Deshmukh | former home minister anil deshmukh statement to ed regarding resignation from home minister post of maharashtra

 

हे देखील वाचा :

Supreme Court On Husband Property | सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा ! मृत्यूपत्राद्वारे मिळालेल्या पतीच्या संपत्तीवर पत्नीचा हक्क किती?

Gajanan Babar Passes Away | पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेची पहिली शाखा सुरु करणारे माजी खासदार गजानन बाबर यांचे निधन; 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Nitesh Rane | भाजपचे आमदार नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी

Raj Thackeray | युतीबाबत राज ठाकरेंनी केलं महत्वाचं विधान, पदाधिकार्‍यांना म्हणाले…

 

Related Posts