IMPIMP

Bachu Kadu Meet CM Eknath Shinde | बच्चू कडू नाराज, ’CM शिंदेंनी शब्द दिलेला, बनवायला हवे होते’; एकनाथ शिंदेंची घेतली भेट

by nagesh
Maharashtra Cabinet Meeting | maharashtra cabinet eknath shinde and devendra fadnavis approve fund for irrigation project in bacchu kadu constituency

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Bachu Kadu Meet CM Eknath Shinde | शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Government) कालच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता नाराजी नाट्य सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात मंत्रिपदासाठी झालेल्या आमदारांच्या निवडीनंतर भाजपामध्ये (BJP) शांतता असली तरी शिंदे गटात (Shinde Group) मात्र नाराजी सूर घुमू लागला आहे. हे नाराज आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना भेटून नाराजी व्यक्त करत असल्याचे दिसते. मंत्रिमंडळ विस्तारात (Maharashtra Cabinet Expansion) अपक्ष आमदारांना स्थान न मिळाल्याने ते देखील नाराज आहेत. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडून (Bachu Kadu) नाराज असून त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. (Bachu Kadu Meet CM Eknath Shinde)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बच्चू कडू यांनी आज सकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी शिंदे समर्थक अपक्ष आमदारांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी न दिल्याबाबत चर्चा केली. यावर सप्टेंबरमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा नक्की मंत्रिपद देऊ, असे आश्वासन शिंदे यांनी दिल्याचे समजते.

 

दरम्यान, आज पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू यांनी ही नाराजी उघडपणे व्यक्त केली.
ते म्हणाले की, शिंदेंनी मंत्रिपद देण्याचे आम्हाला आश्वासन दिले होते. मंत्री बनवितो म्हणालेले,
तर बनवायला हवे होते. परंतू पहिल्या विस्तारात मिळाले नाही. पहिल्या नाही निदान शेवटच्या तरी देतील.
नाही दिले तर विचार करू, असे म्हणत कडू यांना मुख्यमंत्री शिंदे यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.

 

त्यांनी पुढे म्हटले की, नाराजी आहे, पण एवढीही नाही की दुसरीकडे जाऊ. ही क्षणीक नाराजी आहे.
सर्वच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असता तर वेगळी गोष्ट असती. काही मुद्द्यांना घेऊन आम्ही शिदेंना पाठिंबा दिला होता.
त्यांनी काही सांगितलेले म्हणून आम्ही मागितले. हे राजकारण आहे. यात दोन आणि दोन चार होत नाही, शून्यही होऊ शकतो.
अडीच वर्षांनीदेखील मंत्रिमडळ विस्तार होऊ शकतो. काहीही सांगू शकत नाही, अशी शक्यता सुद्धा कडू यांनी व्यक्त केली.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Bachu Kadu Meet CM Eknath Shinde | bachu kadu displeased on eknath shinde cabinet expansion met eknath shinde as he was not given a place in the cabinet

 

हे देखील वाचा :

Shivsena | सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीआधी उद्धव ठाकरे गटाला दिलासा, विधान परिषदेत विरोधी पक्ष म्हणून मान्यता

CM Eknath Shinde | नाराजी नाट्य ? 6 ते 7 वजनदार आमदार एकनाथ शिंदेंना वैयक्तिकरीत्या भेटले अन्

Pune Crime | धक्कादायक! पती घरात नसताना नातेवाईक तरुणाकडून विवाहितेवर वर्षभर बलात्कार, फोटो व्हायरल करण्याची धमकी

 

Related Posts