IMPIMP

BJP Chitra Wagh On NCP Rajan Patil | ‘आता फोटोवर चपला मारून आंदोलन करणार का?’; राजन पाटलांच्या वक्तव्यावर चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीला सवाल

by nagesh
 Chitra Wagh | bhim army threatened to throw ink on chitra wagh face

वर्धा : सरकारसत्ता ऑनलाईन  – BJP Chitra Wagh On NCP Rajan Patil | राष्ट्रवादीचे (NCP) माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांच्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. एका सभेला संबोधित करताना राजन पाटील, ‘पाटलांच्या पोरांना लग्नाच्या आधीच तुझ्याएवढी बाळं असतात आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे’, असे म्हणाले होते. त्यानंतर सगळीकडून त्यांची टीका होत आहे. आता भाजपच्या (BJP) महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी देखील राजन पाटील यांच्या वक्तव्याची टीका केली आहे. तसेच चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सुद्धा टीकास्त्र सोडले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्या म्हणाले, ‘आठ दिवसांपूर्वी महिला सन्मानाची भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाची त्यांच्याच पक्षाच्या नेत्याने आता जी काही माती केली आहे, त्याबद्दल त्यांनीच बोलावं. राजन पाटील यांचं वक्तव्य अतिशय संतापजनक आणि निषेधार्ह आहे. ज्या प्रकारची मानसिकता त्यांनी दाखवली आहे, ती त्यांची आहे, की त्यांची पक्षाची आहे, ही भूमिका नक्की कोणाची आहे, हे कळणे अतिशय गरजेचे आहे. हा वाद काही जुना नाही, एकीकडे महिलांच्या सन्मानाच्या गोष्टी होत असताना, दुसरीकडे राष्ट्रवादीच्या या नेत्याने तर महाराष्ट्रातील सर्व महिलांची खिल्ली उडवण्याचं काम केलं आहे. याचा निषेध करावा तितका कमी आहे.’

 

त्यांनी पुढे राष्ट्रवादीच्या नेत्यांना आव्हान देत म्हणाल्या, ‘मला आता बघायचं आहे की महाराष्ट्रातल्या रणरागिणी
ज्यांचा महिला सन्मानाबाबत गेल्या आठ दिवसांपासून गदारोळ करत होत्या.
आता त्यांच्याच पक्षाच्या नेत्याने अशाप्रकारचे वक्तव्य केले आहे, तर त्या नेत्याला तुम्ही महाराष्ट्रात फिरु
देणार नाही का? फोटोवर चपला मारून आंदोलन करणार आहेत का?’ चित्रा वाघ यांनी राजन पाटलांवर कलम
३५४ अंतर्गत विनयभंगाच गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे.
या प्रकारचे वक्तव्य संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांचा अपमान असे त्या म्हणाल्या.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- BJP Chitra Wagh On NCP Rajan Patil | women in maharashtra were molested by rajan patils statement filed a case of 354 against him says chitra wagh wardha news

 

हे देखील वाचा :

Shiv Bhojan Thali Audit | शिंदे फडणीस सरकारच्या रडारवर शिव भोजन थाळी, होणार लेखापरीक्षण

Ram Shinde On Jitendra Awhad | ‘कायदा हातात घेऊन स्टंट करणे, जितेंद्र आव्हाडांच्या अंगाशी आले’

रोहित, विराट, द्रविडसोबत चर्चा करून भविष्याचा निर्णय घेऊ; BCCI ने भूमिका केली स्पष्ट

 

Related Posts