IMPIMP

Ram Shinde On Jitendra Awhad | ‘कायदा हातात घेऊन स्टंट करणे, जितेंद्र आव्हाडांच्या अंगाशी आले’

by nagesh
Ram Shinde On Jitendra Awhad | bjp leader ram shinde dont take law your hands har har mahadev doing stunts jitendra awhad

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Ram Shinde On Jitendra Awhad | ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा ठाण्यातील प्रयोग बंद पाडल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना वर्तक नगर पोलिसांनी (Vartak Nagar Police Station) अटक केली आहे. त्यांच्या विरोधात एका तरुणाने वर्तक नगर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांच्या अटकेवर राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध व्यक्त केला. त्यांच्या या अटकेवर आता भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी भाष्य केले आहे. स्टंटबाजी करत कायदा हातात घेणे जितेंद्र आव्हाड यांना महागात पडले आहे, असे राम शिंदे म्हणाले. (Ram Shinde On Jitendra Awhad)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आपल्या देशात कायदा आहे. या कायद्याच्या आधारे सेंन्सॉर बोर्डाने हर हर महादेव चित्रपटाला मान्यता दिली होती . त्यामुळे चित्रपटाला मान्यता असताना देखील चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना मारहाण करणे, कोणत्या कायद्यात बसते, असा प्रश्न राम शिंदे यांनी विचारला. केंद्रीय राज्य मंत्री प्रल्हाद सिंग पटेल (Prahlad Singh Patel) यांच्यासोबत शिंदे बारामती दौऱ्यावर गेले होते. यावेळी बारामतीतील भाजप कार्यालयात त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. त्यावेळी शिंदे म्हणाले, अशी मारहाण होत असेल, तर संबंधितांना अटक होऊन कारवाई होणारच. जितेंद्र आव्हाडांचा हा स्टंट त्यांच्या अंगाशी आला आहे.

 

‘हर हर महादेव’ चित्रपटात इतिहासाची मोडतोड झाल्याचा दावा काही संघटना आणि इतिहास अभ्यासकांनी केला आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेड आघाडीवर आहे. तसेच इतिहास संशोधक आणि अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे, इद्रजित सावंत यांनी देखील या चित्रपटाला विरोध केला आहे.

 

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली होती. संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati)
यांनी देखील या चित्रपटाला विरोध केला आहे. त्यामुळे हा वाद चिघळला होता.
जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी ठाण्यातील विवियाना मधील चित्रपटाचा प्रयोग बंद पाडला होता.
तसेच तेथील प्रेक्षकांना देखील मारहाण केली होती. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यांच्या अटकेचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध केला गेला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ram Shinde On Jitendra Awhad | bjp leader ram shinde dont take law your hands har har mahadev doing stunts jitendra awhad

 

हे देखील वाचा :

Pune Maval Gram Panchayat Elections | मावळातील 9 ग्रामपंचायतीच्या ‘या’ तारखेला निवडणुका

रोहित, विराट, द्रविडसोबत चर्चा करून भविष्याचा निर्णय घेऊ; BCCI ने भूमिका केली स्पष्ट

Chandarashekhar Bawankule-Uddhav Thackeray | चंद्रशेखर बावनकुळेंनी धरलं उध्दव ठाकरेंनाच जबाबदार, म्हणाले – ‘प्रकल्प त्यांच्यामुळेच…’

NCP MLA Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड यांच्यासह 12 जणांना जामीन मंजूर; जाणून घ्या कोर्टात काय-काय झालं

 

Related Posts