IMPIMP

Rajya Sabha Election 2022 | ‘महाविकास आघाडीतला एक ‘संजय’ जाणार’ – भाजपा नेत्याचं मोठं विधान

by nagesh
Yakub Memon Grave | yakub menon grave beautification controversy shiv sena leader ambadas danve answer to bjp ashish shelar chandrashekhar bawankule criticism

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Rajya Sabha Election 2022 | राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election 2022) आज 10 जून रोजी मतदान होत आहे. मात्र या मतदानापूर्वी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजपकडून (BJP) विजयाची दावे केले जात आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात मोठी चुरस होण्याची शक्यता आहे. अशातच भाजपचे नेते आणि राज्यसभा निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी मोठं विधान केलं आहे. ‘महाविकास आघाडीतला एक संजय जाणार,’ असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वातावरणात अनेक वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अनिल बोंडे म्हणाले, “शंभर टक्के आत्मविश्वास आहे, आमच्या मनात अजिबात धाकधूक नाही,” असं अनिल बोंडे यांनी विधीमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. “महाभारतात ज्याप्रमाणे अश्वत्थामा गेला तसं या निवडणुकीत कोणीतरी संजय जाणार हे नक्की आहे,” असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

 

त्याचबरोबर यावेळी संजय राऊत जाणार का? असं अनिल बोंडे यांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “कोणता अश्वत्थामा गेला होता हेदेखील धर्मराजाने सांगितलं नव्हतं. त्यामुळे कोणता संजय जाणार हे मी सांगणार नाही, ते नंतर कळेल” असं ते म्हणाले. या दरम्यान, शिवसेनेकडून राज्यसभेसाठी संजय राऊत (Sanjay Raut) आणि संजय पवार (Sanjay Pawar) यांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळे अनिल बोंडे यांचा रोख नेमका कोणाकडे होता? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 

Web Title :- bjp leader anil bonde mahavika aghadi shivsena sanjay raut rajya sabha election 2022

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोन्यात तेजी तर चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

Bombay High Court-Nagpur Bench | ‘प्रेमसंबंध तोडणे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे’ – उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

Maharashtra School Start | चला दप्तर भरा ! शैक्षणिक वर्ष 13 जूनपासून तर शाळा 15 जूनला सुरू होणार

 

Related Posts