IMPIMP

Eknath Khadse | खडसे-अमित शहा भेटीवर राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण, ही भेट घेण्यापूर्वी…

by nagesh
 Eknath Khadse | eknath khadse statement on speculation of joining bjp and meeting with amit shah

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांची भेट घेतल्याचे वृत्त माध्यमांमधून दिले जात आहे. ते पूर्णपणे चुकीचे आहे. अमित शाह आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या भेटीची चर्चा आहे, ती भेट झालेली नाही. दोघांमध्ये फोनवर चर्चा झालेली आहे. ही भेट घेण्यापूर्वी एकनाथ खडसे यांनी संपूर्ण विषय राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना सांगितला होता, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी देत या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे अमित शाह यांना भेटणार होते. खडसे एकटे जाणार नव्हते. पवार साहेबांसोबत ते जाणार होते. अजून ती भेट झालेली नाही. त्यामुळे खडसे भाजपमध्ये (BJP) जाणार, हे वृत्त दिले जात आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे. खडसे यांनी देखील याबाबत खुलासा केला आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर खडसे यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्याचमुळे हा विषय चुकीचा आहे, अशी काहीही परिस्थिती नाही, असं तपासे यांनी स्पष्ट केलं.

 

मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली आहे, या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वागत करते. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची शिवसेनेची 40 वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुढे नेत आहेत. अनेक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते या दसरा मेळाव्यातील (Dasara Melava 2022) भाषण ऐकत असतात. त्यामुळे त्यांना मिळालेली परवानगी ही योग्यच असल्याचे तपासे यांनी सांगितले.

 

एकनाथ खडसे यांनी अमित शहांना भेटण्यासाठी गेल्याची माहिती खरी असल्याचे सांगताना अमित शाह आणि
नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबरोबर आपले मागील अनेक वर्षापासून चांगले वैयक्तीक संबंध
आसल्याचे खडसे यांनी सांगितले. अमित शहांना एकदा भेटलो नाही याआधी पण भेटलो आहे.
देवेंद्रजींनाही (Devendra Fadnavis) भेटलो आहे आणि या पुढेही भेटणार आहे.
शहांना भेटू नये असा नियम आहे. हे जेव्हा गोधडीत होते तेव्हापासून माझे संबंध आहेत, असे खडसे यांनी सांगितलं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Eknath Khadse | NCP leader eknath khadse to meet amit shah ncp clarification

 

हे देखील वाचा :

LIC च्या या प्लानमध्ये रोज 73 रुपये जमा करून मॅच्युरिटीवर मिळवा पूर्ण 10 लाख रुपये, जाणून घ्या डिटेल्स

Problem Of White Discharge | व्हाईट डिस्चार्जने त्रस्त असाल तर ‘या’ 5 आयुर्वेदिक उपायांनी करा उपचार

Uric Acid Control Tips | वाढत्या यूरिक अ‍ॅसिडने असाल त्रस्त तर सकाळी रिकाम्या पोटी करा लिंबूचे सेवन, जाणून घ्या पद्धत आणि फायदे

Pre-Diabetes Diet | प्री-डायबिटीज असेल तर आजच ‘या’ 8 फूड्सपासून राहा दूर

 

Related Posts