IMPIMP

Cabinet Meeting Decision | 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर ‘सेवा पंधरावडा” म्हणून साजरा होणार, मंत्रिमंडळ बैठकीतील 6 मोठे निर्णय (व्हिडिओ)

by nagesh
Maharashtra Political News | bjp leader devendra fadnavis reaction on cm eknath shinde upset uday samant

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Cabinet Meeting Decision | राज्य मंत्रिमंडळाची आज (सोमवार) बैठक पार पडली आहे. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात (Cabinet Meeting Decision) आहेत. यामध्ये 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा ‘सेवा पंधरवाडा’ म्हणून आम्ही साजरा करणार आहोत. 17 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा वाढदिवस आहे. पंतप्रधान मोदींचा आग्रह असतो की माझा वाढदिवस साजरा करु नका, जनतेची सेवा करा, त्यामुळे हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या जयंतीपर्यंत म्हणजे, राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या 15 दिवासांमध्ये जनतेची सेवा करणार आहोत. जनतेची जी काही प्रलंबित प्रकरण (Pending Case) आहे, ते निकाली काढणार आहोत. यामध्ये अगदी रेशन कार्डची (Ration Card) सुद्धा रखडलेली काम करणार असल्याच फडणवीस यांनी सांगितले. तसेच कोविड काळातील कंत्राटी वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांचे गुणांकन करणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर (Cabinet Meeting Decision) फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधून माहिती दिली.

 

 

 

मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय

 

1. अतिवृष्टीबाधित किंवा आपत्तीप्रवण गावांचे पुनर्वसन करणार. नागरी सुविधा पुरविण्यासाठी धोरण (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग)

2. नाशिक जिल्हयातील उर्ध्व गोदावरी प्रकल्पास चौथी सुधारीत प्रशासकीय मान्यता. (जलसंपदा विभाग)

3. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) न्यायालय (Civil Court) स्थापन करण्यास मान्यता. (विधी व न्याय विभाग)

4. महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणाच्या (Maharashtra Sales Tax Tribunal) मुंबई, पुणे व नागपूर खंडपीठास मुदतवाढ. (वित्त विभाग-Finance Department)

5. केंद्र पुरस्कृत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणीकरण करण्यासाठी योजना राबविणार. (सहकार विभाग)

6. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयामुळे सप्टेंबर 2022 पूर्वी पार पडणार नसल्याने प्रशासकाचा कालावधी वाढणार. (ग्रामविकास विभाग)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

इतर विषय

 

– 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रनेता से राष्ट्रपिता हा सेवा पंधरवडा राबविणार. नागरिकांचे अर्ज व तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी हा उपक्रम.

– कोविड काळातील कंत्राटी वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांचे गुणांकन करणार.

कोविड प्रतिबंधक लसीची बूस्टर मात्रा देण्याची मोहीम अधिक वेगाने राबविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.. रुग्ण संख्या कमी होत असली तरी गाफील न राहता लसीकरण वाढवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले.

 

 

Web Title :-  Cabinet Meeting Decision | maharashtra will celebrate seva fortnight on the occasion of prime minister modis birthday say devendra fadnavis know six big decision of maharashtra eknath shinde govt

 

हे देखील वाचा :

Pune Chandani Chowk Bridge Demolition | चांदणी चौकातील जुना उड्डाणपूल पाडणे आणि त्यानंतरच्या वाहतुकीबाबत NHAI चा आराखडा

Business Idea | केवळ 25,000 रुपयात सुरू करा हा सुपरहिट बिझनेस, दरमहिना होईल लाखो रुपयांची कमाई

Share Market | ‘या’ आठवड्यात कशी होईल शेअर मार्केटची वाटचाल? हे फॅक्टर लक्षात घेऊन करा गुंतवणूक

 

Related Posts