IMPIMP

Chandrashekhar Bawankule | ‘बाळासाहेब हे लढवय्ये होते, तर उद्धव ठाकरे रडोबा आहेत’, बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात (व्हिडिओ)

by nagesh
Chandrashekhar Bawankule | BJP leader chandrashekhar bawankule slams uddhav thackeray maharashtra political crisis

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाईन – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) लढवय्ये होते, उद्धव ठाकरे रडोबा आहेत. रणांगणातून ते पळून गेले. नैतिकता शब्द उद्धव ठाकरे यांच्या तोंडी शोभत नाही.अशी टीका बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे. ते सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे केवळ रडोबा आहेत. लोकांना रडोबाचे राजकारण चालत नाही. रडोबाच्या राजकारणाने विकास होत नाही, त्यांच्या रक्तामध्ये विकास, दूरदृष्टी आणि पक्ष नेतृत्व करण्याची क्षमता नाही. स्वत: शरद पवार (Sharad Pawar) यांना वाटतं की, निर्णय चुकला. महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) नेता अशा व्यक्तीला बनवलं ज्याला आपला पक्ष नीट सांभाळता आला नाही. त्यामुळे मला वटतं उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे.

 

 

उद्धव ठाकरेंनी कुठेही जावं

संजय राऊत (Sanjay Raut) अंघोळीसाठी साबण काँग्रेसचा (Congress) वापरतात, पावडर राष्ट्रवादीची (NCP) वापरतात आणि शिवसेनेला धुवून काढतात. संजय राऊतांना आमचे नितेश राणे (Nitesh Rane) धुवून काढतात, अशी टीका राऊतांवर केली. तसेच पुन्हा कोर्टात जाण्याचे विधान उद्धव ठाकरे यांनी केले होते. यावरुन बावनकुळे यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांना जिथे जायचे तिथे जावे. त्यांना आता कामच राहिले नाही. दिवसभर फक्त पुस्तक चाळण्याचे काम त्यांच्याकडे आहे, असा टोला त्यांनी लगावला.

 

 

राष्ट्रवादीमुळे निवडणुका लांबणीवर

स्थानिक स्वराज्य निवडणुकांवर (Local Body Elections) बावनकुळे म्हणाले, स्थानिक स्वराज्य
संस्थेच्या निवडणुका या राष्ट्रवादी काँग्रेसमुळे लांबणीवर पडल्या आहेत. मविआन चुकीच्या पद्धतीने जागा
वाढवून घेतल्या तो निर्णय आम्ही रद्द केला. यामुळे ते कोर्टात गेले आहेत.
त्यामुळे राज्यातील निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.
राष्ट्रवादी कोर्टातील केस मागे घ्यावी उद्या निवडणूका लढवण्याची तयारी असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Chandrashekhar Bawankule | BJP leader chandrashekhar bawankule slams uddhav thackeray maharashtra political crisis

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil – Pune Kharip Hangam | पुणे जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न ! बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशक प्रकरणात गुन्हे दाखल करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Vision Cup Under-15 Cricket Tournament | ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद १५ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा; जॅग्वॉर्स इलेव्हन, लायन्स् इलेव्हन, लेपर्डस् इलेव्हन संघांची विजयी सलामी

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : पत्रकारांना मॅनेज करावे लागेल ! पोलिस व पत्रकारांची भिती घालुन 10 लाखाच्या खंडणीची मागणी; मानव विकास परिषदेचा प्रदेशाध्यक्ष संदिप कुटे विरूध्द FIR

 

Related Posts