IMPIMP

Chitra Wagh | ‘शिवसेनेच्या नेत्यावर बलात्काराचा आरोप करणारी पीडिता गोव्यात सापडली’ – चित्रा वाघ

by nagesh
Chitra Wagh | bjp leader chitra wagh claim raghunath kuchik rape case victim girl found in goa

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Chitra Wagh | पुण्यातील (Pune) शिवसेनेचे (Shivsena) नेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी पीडित तरूणी गायब असल्याचा दावा भाजपने (BJP) केला होता. संबंधित तरूणी आता सापडली आहे. याबाबत भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा (BJP Women State President) चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी माहिती दिली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणातील मुलगी दोन दिवसांपासून गायब होती. गायब मुलगी गोवा (Goa) राज्यातील मडगावच्या (Madgaon) कोलवा गावामध्ये सापडली आहे. काल रात्री तिचा फोन मला आला होता. तिला इंजेक्शन (Injection) देऊन काही व्यक्तींनी नेलं होतं. या व्यक्तींमध्ये पोलिसही (Police) होते. या पीडितेला महाराष्ट्रातून (Maharashtra) नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तिच्याकडून काही कागदपत्रांवर सह्या देखील घेण्यात आल्याची माहिती तीने स्वत: मला दिली आहे. यासंदर्भात मी पुणे पोलिसांना (Pune Police) सविस्तर कळवल्याचं चित्रा वाघ यांनी सांगितंल.

 

नक्की काय आहे प्रकरण –
पुण्याचे शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. 24 वर्षीय तरूणीला लग्नाचं आमिष दाखवत शारीरिक संबंध ठेवले. एवढंच नाही तर पीडित तरूणी गर्भवती राहिल्याने जबरदस्तीने गर्भपात (Abortion) केल्याचा आरोप कुचिक यांच्यावर करण्यात आला आहे.

दरम्यान, चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे.
यामध्ये त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. पुणे पोलिसांचाही यामध्ये समावेश असल्याचा आरोपही वाघ यांनी केला आहे.

 

 

Web Title :- Chitra Wagh | bjp leader chitra wagh claim raghunath kuchik rape case victim girl found in goa

 

हे देखील वाचा :

Chandan Benefits | चेहर्‍यावर अशाप्रकारे लावा चंदन, दूर होतील ‘या’ 4 समस्या; जाणून घ्या

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना ‘होळी’चं मोठं गिफ्ट, DA मध्ये वाढ

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 125 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts