IMPIMP

Chitra Wagh | पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण : संजय राठोडसंदर्भात प्रश्न विचारताच चित्रा वाघ पत्रकारांवर भडकल्या, म्हणाल्या- ‘तुम्ही सुपारी… ‘

by nagesh
Chitra Wagh | bjp woman morcha state president chitra wagh angry on journalist over puja chavan case question

यवतमाळ : सरकारसत्ता ऑनलाईन- राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील (Shinde-Fadnavis Government) मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात (Pooja Chavan Death Case) आरोप करुन आपण त्यांचे राजकीय जीवन उध्वस्त केले नाही काय, असा प्रश्न विचारताच भाजप महिला मोर्चाच्या (BJP Mahila Morcha) प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) पत्रकारांवर भडकल्या. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारास पत्रकार परिषदेत का बोलावले? यापुढे अशा पत्रकारांना आपल्या पत्रकार परिषदेत (Press Conference) आमंत्रित करायचे नाही, असा दम स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिला. यावेळी चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि पत्रकारांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. पत्रकारांनी वाघ यांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकून निषेध नोंदवला.

 

महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे स्वीकारताच चित्रा वाघ (Chitra Wagh) या विदर्भ दौऱ्यावर आल्या आहेत. आज शुक्रवारी त्यांनी यवतमाळ येथे भेट दिली. यावेळी स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारने (State Government) गेल्या 100 दिवसांत महिलांच्या सन्मानासाठी राबविलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. याच अनुषंगाने पत्रकारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री असलेले संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण प्रकरणात केलेले आरोप मागे घेऊन आपणही त्यांना क्लीनचिट दिली का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या,
आपली संजय राठोड यांच्याविरोधात सुरु असलेली लढाई त्यांच्यावर गुन्हे (FIR) दाखल होईपर्यंत सुरुच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राठोड यांना मंत्रीमंडळात घेतले.
त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर आरोप करुन त्यांचे राजकीय जीव उद्धवस्त केले नाही का,
असा प्रश्न एका इंग्रजी दैनिकाच्या पत्रकाराने विचारताच वाघ यांनी, तुम्ही संजय राठोड यांच्याकडून सुपारी घेतली काय,
असा प्रतिप्रश्न केला. बहुतांश पत्रकारांना वाघ यांनी प्रश्न विचारु दिले नाही. त्यामुळे पत्रकार आणि वाघ यांच्यात वाद झाला.
या वादानंतर पत्रकारांनी वाघ यांचा निषेध नोंदवून सर्व पत्रकार पत्रकारपरिषदेतून बाहेर पडले.

 

Web Title :- Chitra Wagh | bjp woman morcha state president chitra wagh angry on journalist over puja chavan case question

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | ‘शिवसेना आगामी काळात मोठा लढा उभा करेल’ – संजय राऊत

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांना अटक; ट्विटरवरून दिली माहिती

Nitesh Rane | हातात भगवा घेतला म्हणून कोणी हिंदुत्ववादी होत नाही – नितेश राणे

Nitin Gadkari | ‘वेगळ्या विदर्भाचा वाद पुन्हा चर्चेत’, आंदोलन समिती मागणार गडकरींसह १० खासदारांचा राजीनामा

 

Related Posts