IMPIMP

CM Eknath Shinde | “धनगर समाजाला भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावणार” – CM एकनाथ शिंदे

by nagesh
CM Eknath Shinde | cm eknath shindes banners in aaditya thackerays worli constituency on occasion of navratri 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन CM Eknath Shinde | वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी धनगर समाजाचे (Dhangar Society) प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही दिली आहे. धनगर समाजाला भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावणार आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट असला तरी राज्यशासन या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

 

त्यावेळी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले की, “धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सर्व सोई-सुविधा दिल्या जातील. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येईल. विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातील. अहिल्याबाई होळकर यांचे भव्य स्मारक व्हावे ही माझीही इच्छा आहे. राज्यात त्यांचे भव्यदिव्य स्मारक उभारले जाईल.”

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, अहमदनगरला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याची बाब तपासून कार्यवाही करण्यात येईल.
असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.
तसेच, आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत, ते मागे घेतले जातील.
धनगर वाड्या वस्त्यांत सोयी सुविधा दिल्या जातील.
तर, आत्मदहन करणाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी दहा लाख रुपये देऊ व त्यांना नोकरी देण्याबाबतही निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.

 

Web Title :- CM Eknath Shinde | chief minister eknath shinde solve problems of dhangar society reservation

 

हे देखील वाचा :

Abdul Sattar On Uddhav Thackeray | ‘…तर पहिल्याच निवडणुकीत किती मतांनी जिंकतो हे दाखवणार’ – अब्दुल सत्तार

Maharashtra Rains Update | राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; पुढील 3 दिवस मुसळधार – IMD

Devendra Fadnavis | चंद्रकांत पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण

 

Related Posts